Home अहमदनगर अहमदनगर: दुध घेण्यासाठी निघाले अन पतंगाच्या मांजाने गळाच चिरला

अहमदनगर: दुध घेण्यासाठी निघाले अन पतंगाच्या मांजाने गळाच चिरला

Ahmednagar | Kopargaon News: रस्त्यांवरून मोटारसायकलवर जात असताना पोस्ट ऑफिसजवळ एक पतंगाला असलेल्या मांजाने त्यांचा गळा चिरला, सुदैवाने प्राण वाचले.

take a drink and his throat was cut by the sting of a moth

कोपरगाव:  मकर संक्रातनिमित्त पतंगबाजीचा खेळ अहमदनगर जिल्ह्यात ही मोठ्या प्रमाणात खेळला जातो. परंतु, सध्या पतंग उडवण्यासाठी आता नायलॉन मांजाचा उपयोग जास्त होत असल्याचे निदर्शनास येत आहे. नायलॉन मांजावर बंदी घालण्यात आलेली आहे. या नायलॉन मांजामुळे पशुपक्ष्यांना प्राण्यांना आणि माणसांनादेखील जीवाला मोठा धोका आहे. आज कोपरगाव शहरातील धान्यांचे व्यापारी आनंद गंगवाल हे दूध घेण्यासाठी धारणगाव रस्त्यांवरून मोटारसायकलवर जात असताना पोस्ट ऑफिसजवळ एक पतंगाला असलेल्या मांजाने त्यांचा गळा चिरला आहे.

सुदैवाने यामध्ये त्यांचे प्राण वाचले. सध्या अनेक ठिकाणी कायद्याने बंदी असलेला नायलॉन मांज्याची छुप्या पद्धतीने विक्री सुरू आहे. तर काही पतंगप्रेमी शेजारील तालुक्यात जाऊन नायलॉन मांजा घेऊन येत आहेत. आहे. नायलॉन मांजामुळे अनेकांचे गळा चिरणे, हात कापणे अशा घटना होत असतात.

Web Title: take a drink and his throat was cut by the sting of a moth

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here