Home संगमनेर संगमनेर: मालवाहू टँकर व छोटा हत्ती टेम्पोचा भीषण अपघात, एक जागीच ठार

संगमनेर: मालवाहू टँकर व छोटा हत्ती टेम्पोचा भीषण अपघात, एक जागीच ठार

Sangamner Accident News: कासारे शिवारात अपघात, एका जण ठार, अकस्मात मृत्यूची नोंद.

tanker and small elephant Tempo crash, killed on the spot Accident 

संगमनेर: संगमनेर तालुक्यातील कासारे शिवारात मालवाहू  टँकर व छोटा हत्ती टेम्पोची धडक झाल्याने भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एक जण जागीच ठार झाला आहे. तळेगाव मार्गे असलेल्या लोणी ते नांदूर शिंगोटे रस्त्यावर हा अपघात मंगळवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडला. याप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

शिवाजी शहाजी वर्पे (वय 45 वर्ष, रा. पिंपळगाव खोंडी ता. राहाता) असे मयत व्यक्तीचे नाव आहे.  

याबाबत अधिक माहिती अशी की, लोणी ते नांदूरशिंगोटे रस्त्याने छोटा हत्ती टेम्पो (क्रमांक एमएच 17 बीवाय 6393) जात असताना समोरून आलेल्या व तळेगाव दिघेच्या दिशेने जाणार्‍या मालवाहू टँकरची (क्रमांक एमएच 44 यु 3195) समोरासमोर धडक होत अपघात झाला. अपघातात जबर मार लागल्याने शिवाजी शहाजी वर्पे (वय 45, रा. पिंपळगाव खोंडी ता. राहाता) हे जा या घटने बाबत वसंत भाऊसाहेब हासे (रा. समनापुर) यांनी पोलिसांत खबर दिली. त्यानुसार संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार लक्ष्मण औटी, पोलीस नाईक बाबा खेडकर अधिक तपास करीत आहेत. अपघातात दोन्ही वाहनांच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले.

Web Title: tanker and small elephant Tempo crash, killed on the spot Accident 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here