Home अहमदनगर धक्कादायक: शिक्षकाने स्वत: च्या जागेवर नेमला शिक्षक: दोन वर्षांपासून करतोय काम

धक्कादायक: शिक्षकाने स्वत: च्या जागेवर नेमला शिक्षक: दोन वर्षांपासून करतोय काम

Ahmednagar | Parner News: हिवरे कोरडा प्राथमिक शाळेत शिकवतोय डमी शिक्षक, पतसंस्था कर्मचारी असलेल्या एका तरुणाला शिक्षक म्हणून नेमणूक केल्याचा धक्कादायक प्रकार.

teacher appointed by the teacher in his own place

पारनेर: जिल्हा परिषदेच्या पारनेर तालुक्यातील हिवरे कोरडा येथील मांजरधाव प्राथमिक शाळेतील एका शिक्षकाने स्वतःच्या जागेवर पतसंस्था कर्मचारी असलेल्या एका तरुणाला शिक्षक म्हणून नेमणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दोन वर्ष हा प्रकार सुरू असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांच्या

हिवरे कोरडा येथील जिल्हा परिषदेच्या मांजरधाव प्राथमिक शाळेत बाजीराव पानमंद हे प्राथमिक शिक्षक म्हणून नोकरीस आहेत. पानमंद हे गोरेश्वर ग्रामीण पतसंस्था संस्थापक अध्यक्ष आहेत. पतसंस्थेमध्ये वेळ देता यावा म्हणून बाजीराव पानमंद यांनी स्वतः च्या प्राथमिक शिक्षकाच्या नोकरीकडे दुर्लक्ष केले. स्वतः अध्यक्ष असलेल्या गोरेश्वर पतसंस्थेचा कर्मचारी कुलदीप जाधव याची विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी नेमणूक केली होती. आणला. गुरुवारी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुवर्णा अडसूळ यांच्या सह ग्रामस्थांनी हा प्रकार उघडकीस  आणला.

असा प्रकार घडल्याने येथील ग्रामस्थांनीही नाराजी व्यक्त केली आहे. याप्रकाराने पारनेर तालुक्यातील शिक्षण विभागातही खळबळ उडाली आहे. आता याबाबत काय कारवाई होते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Business Idea | तुम्हाला तुमचा स्वतः चा बिजनेस सुरु करायचा मग हा व्हिडियो जरूर पहा

तो डमी शिक्षक पतसंस्था कर्मचारी

हिवरे कोरडा प्राथमिक शाळेत बेकायदा शिकविणारा कुलदीप जाधव याने लेखी पत्र दिले आहे. मी गोरेश्वर पतसंस्था कर्मचारी असून बाजीराव पानमंद यांच्या सांगण्यावरून शाळेत शिकवत होतो, असे त्याने पत्रात म्हटले आहे.

दोन वर्षांपासून जाधवच शिक्षक

आम्हाला दोन वर्षांपासून कुलदीप जाधव हे शिक्षक शिकवत असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. यामुळे बाजीराव पानमंद यांचा बेकायदेशीर उद्योग विद्यार्थ्यांनी पुढे आणला आहे.

“नुकत्याच ग्रामपंचायत निवडणुका झाल्या आहेत. त्यामुळे राजकीय द्वेषातून माझी बदनामी करण्याचा हा प्रयत्न सुरु आहे. हे एक राजकीय षड्यंत्र आहे. मी रीतसर रजा घेतली आहे.” -बाजीराव पानमंद, शिक्षक

बाजीराव पानमंद हे शिक्षक ५ जानेवारीपासून रजेवर होते. मात्र त्यांनी बेकायदा स्वतः च्या जागेवर दुसऱ्या शिक्षकाची नेमणूक केली आहे. याबाबत चौकशी करण्यात येऊन वरिष्ठांना अहवाल सादर करण्यात येईल. – बाळासाहेब बुगे, गटशिक्षणाधिकारी, पारनेर

बाजीराव पानमंद हे शिक्षक ५ जानेवारी ते ३१ जानेवारीपर्यंत रजेवर आहेत. त्यामुळे शाळा व्यवस्थापन समिती ठरावानुसार पालक शिक्षक म्हणून कुलदीप जाधव यांची पानमंद यांच्या रजेच्या काळात नेमणूक करण्यात आली आहे. -बशीर तांबोळी, शिक्षक, हिवरे कोरडा, मांजरधाव

Web Title: teacher appointed by the teacher in his own place

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here