Home महाराष्ट्र वसतिगृहातील ‘त्या’ तरुणीवर बलात्कारच

वसतिगृहातील ‘त्या’ तरुणीवर बलात्कारच

शासकीय वसतिगृहातील तरुणीवर बलात्कार (Raped) झाल्याचे न्यायवैद्यक अहवालात (फॉरेन्सिक रिपोर्ट) स्पष्ट, नखांत सापडलेल्या रक्ताचे नमुने जुळले.

That girl in the hostel was raped

मुंबई: चर्नी रोड येथे शासकीय वसतिगृहातील तरुणीवर बलात्कार झाल्याचे न्यायवैद्यक अहवालात (फॉरेन्सिक रिपोर्ट) स्पष्ट झाले आहे. वसतिगृहाचा सुरक्षारक्षक मयत ओमप्रकाश कनोजिया याच्या डीएनएशी संबंधित तरुणीच्या नखांत सापडलेल्या रक्ताचे नमुने जुळले आहेत. त्यामुळे आता पोलिसांकडून लवकरच यासंदर्भातील अंतिम अहवाल न्यायालयात सादर केला जाणार आहे.

मूळची अकोला येथे राहणारी १८ वर्षीय तरुणी २०२१ पासून वसतिगृहात राहत होती. ५ जूनला रात्री उशिराने कनोजियाने तिच्यावर बलात्कार करत तिची हत्या केली. ६ जूनला सायंकाळच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. पोलिसांनी आरोपी ओमप्रकाश कनोजिया विरोधात बलात्कार आणि हत्येचा गुन्हा दाखल आहेत

शवविच्छेदन अहवालात स्पष्टता नव्हती

शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालात बलात्काराबाबत स्पष्टता नसल्याने पोलिसांनी कनोजिया आणि तरुणीचे घटनास्थळावरील पुरावे डीएनए चाचणीसाठी पाठवले होते. त्यातून तरुणीवर बलात्कार झाला होता है स्पष्ट झाल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. आरोपीने आत्महत्या केल्याने या प्रकरणात पोलिसांकडून फायनल समरी न्यायालयात सादर करण्यात येणार आहे.

केला. मृत मुलीच्या भावाच्या फिर्यादीवरून पोलिसांनी ही कारवाई केली. पोलिसांनी घटनास्थळापासून आरोपी ओमप्रकाशच्या आत्महत्येच्या ठिकाणापर्यंतच्या सीसीटीव्ही फुटेजसह सर्व पुरावे ताब्यात घेतले

Web Title: That girl in the hostel was raped

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here