Home बीड आठवीच्या वर्गातील मुलगी झाली आई

आठवीच्या वर्गातील मुलगी झाली आई

Breaking News | Beed Crime: संधीचा गैरफायदा घेत चुलत्यानेच अवघ्या १४ वर्षांच्या आपल्या पुतणीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना.

the cousin abusing his 14-year-old nephew

बीड : साधारण नऊ महिन्यांपूर्वी पीडितेच्या मोठ्या बहिणीचे लग्न होते. त्यामुळे सर्वच कामात व्यस्त होते. याच संधीचा गैरफायदा घेत चुलत्यानेच अवघ्या १४ वर्षांच्या आपल्या पुतणीवर अत्याचार केला. त्यानंतर पीडिता आपल्या आई वडिलांसोबत ऊसतोडणीसाठी कोल्हापूरला गेली. दोन दिवसांपूर्वी कारखाना संपल्याने परत बीडला येत असतानाच कळंबजवळ कळा सुरू झाल्या. रुग्णालयात दाखल केल्यावर तिची प्रसुती झाली. याप्रकरणी चुलत्याविरोधात पिंपळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, पीडिता आठवीच्या वर्गात शिक्षण घेत असल्याचे सांगण्यात आले.

बीड तालुक्यातील एका गावातील पीडितेच्या मोठ्या बहिणीचे जुलै २०२३मध्ये लग्न होते. त्यामुळे घरातील सर्व सदस्य लग्नाच्या कामात व्यस्त होते. याच संधीचा फायदा घेत चुलत्याने पीडिता ही चुलत बहिणीसोबत एका खोलीत झोपली होती.

तिला धमकी देत चुलत्याने तिच्यावर अत्याचार केला. हा प्रकार पीडितेने कोणालाच सांगितला नाही. नंतर पीडिता ही आपल्या आई- वडिलांसह ऊसतोडणीसाठी कोल्हापूर जिल्ह्यात गेली. सहा महिने ऊस तोडण्यात मदतही केली. दोन दिवसांपूर्वी काम संपल्याने हे सर्व लोक गावी परत येत होते. कळंबजवळ येताच पीडितेला कळा सुरू झाल्या. तिला तातडीने कळंबच्या एका रुग्णालयात दाखल केले. तेथे सोनोग्राफी करून लगेच तिची प्रसुती करण्यात आली. तिने एका मुलीलाही जन्म दिला. त्यानंतर याप्रकरणाला वाचा फुटली. रुग्णालयाने पोलिसांना कळविल्यावर कळंब पोलिस ठाण्यात चुलत्याविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला. तो आता झिरोने पिंपळनेर पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे. पिंक पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक अतुलकुमार लांडगे हे तपास करत आहेत.

पीडिता गर्भवती राहिल्याचे पोटावरून स्पष्ट जाणवत होते. परंतु, तिच्या पोटात मासाचा गोळा आहे, तिच्यावर उपचार करायचे आहेत, असे सांगून हा प्रकार झाकण्याचा प्रयत्न केला. परंतु, प्रसुती झाल्याने या अत्याचाराच्या प्रकरणाला वाचा फुटली. चुलत्याविरोधात गुन्हा दाखल झाला असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

पीडिता १४ वर्षांची असून, तिचा चुलत्यावरच आरोप आहे. कळंबमध्ये तिची प्रसुती झाली असून, मंगळवारी तिला भेटायला जाणार आहे. सर्व चौकशी करून आरोपीला अटक व इतर कार्यवाही केली जाईल. अतुलकुमार लांडगे, सहायक पोलिस निरीक्षक, पिंक पथक

Web Title: the cousin abusing his 14-year-old nephew

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here