Theft: कोतूळमध्ये चोरट्यांनी सहा घरे फोडली
कोतूळ | Theft: शहरातील ग्रामीण, रुग्णालय, सौभाग्य मंगल कार्यालय, ब्राम्हणवाडा नाका परिसरात सहा ठिकाणी बंद घरांची कुलुपे तोडून चोरट्यांनी मुद्देमाल लंपास केल्याची घटना घडली आहे.
कोतूळ शहरातील ग्रामीण रुग्णालय परिसरात चार ठिकाणी बंद घराची कुलुपे तोडून उचकापाचक केली. सौभाग्य मंगल कार्यालय परिसरात अभिनव शिक्षण संस्थेच्या शिक्षिका तिलोत्तमा विलास भोत यांचे शनिवारी रात्री दोन ते पहाटे पाच दरम्यान घराचे कुलूप तोडून दीड तोळे सोन्याचे दागिने व चार हजारांची रोख रक्कम असा एक लाखाचा तर परिघा विलास आरोटे या अंगणवाडी सेविकेचे ब्राम्हणवाडा नाक्यावरील पोषण आहार केंद्रातून १० हजाराहून अधिक रकमेचे साहित्य लंपास केले. पोलीस निरीक्षक मिथुन घुगे, सुनील साळवे यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
Web Title: Theft broke into six houses in Kotul