Home अकोले Akole: अकोले तालुक्यात एकाच रात्री फोडली आठ घरे, परिसरात भीती

Akole: अकोले तालुक्यात एकाच रात्री फोडली आठ घरे, परिसरात भीती

Theft Eight houses were demolished in one night in Akole taluka

अकोले | Akole Theft: रविवारी पहाटेच्या सुमारास  तालुक्यातील शेंडी व भंडारदरा परिसरातील ठिकाणी चोरट्यांनी आठ घरफोड्या केल्याचा प्रकार घडला आहे. या घटनेने परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे.

शेंडी येथील तुकाराम धांडे यांच्या बंद घराचा दरवाजा तोडत चोरांनी आत प्रवेश केला सामानाची उचकापाचक केली. धांडे हे कामानिमित्त बाहेरगावी असल्याने चोरीचा तपशील समजला नाही.

राजेश राठोड यांच्याही घराबाहेरील जाळीचा दरवाजा तोडण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला.मात्र कुटुंब जागे झाल्याने ते पसार झाले.

शेंडीतील साबळे व भवारी यांच्या बंद घरावरही चोरट्यांनी चोरी केली. चिंचोडी येथील युसुफ मणियार यांच्या घराशेजारील दुकान फोडून ९४ हाजाराची रोख रक्कम चोरून नेली. मणियार हे राजूर येथे एका लग्नास गेले होते. वारांघुसी गावातही चोरट्यांनी दोन घरे फोडली. या दोन्ही घरांचे मालक मुंबईला राहत असल्याने चोरीस गेल्या ऐवजाची माहिती मिळाली नाही. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली आहे. पोलीस उप अधीक्षक राहुल मदने यांनी घटनास्थळी भेट दिली.

Web Title: Theft Eight houses were demolished in one night in Akole taluka

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here