Home अहमदनगर Theft: दरोड्यात मारहाणीत एकाचा मृत्यू तर महिला गंभीर जखमी

Theft: दरोड्यात मारहाणीत एकाचा मृत्यू तर महिला गंभीर जखमी

Theft in karanji killed and a woman was seriously injured in the robbery

पाथर्डी | Theft: नगर पाथर्डी महामार्गालगत व करंजी गावापासून एक किलोमीटर अंतरावर भावले वस्ती आहे. या वस्तीवर शनिवारी मध्यरात्री चोरट्यांनी दरोडा टाकत चांगलाच धुमाकूळ घातला. यावेळी चोरट्यांनी केलेल्या मारहाणीत एका वृद्धाचा मृत्यू झाला तर एक महिला गंभीर जखमी झाली आहे.

गोपीनाथ लक्षमण भावले वय ८० यांचा मृत्यू झाला तर शांताबाई गोपीनाथ भावले ही महिला गंभीर जखमी झाली आहे.

भावले वस्ती येथे शनिवारी मध्यरात्री १२ वाजेच्या सुमारास चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला. चार पाच चोरट्यांनी घरात झोपलेल्या गोपीनाथ भावले व पत्नी शांताबाई यांना मारहाण केली. चोरट्यांनी लाकडी दांडक्याचा, लोखंडी गजाचा वापर करीत जबर मारहाण केली. यामध्ये गोपीनाथ यांचा मृत्यू झाला.

शेजारच्या घरातील मुलांनी मारहाणीचा आवाज ऐकून पेट्रोल पंपावर व शेजारच्या हॉटेलवर असलेल्या मुलांना फोन केला. ५ ते ६ जणांनी भावले वस्तीकडे धाव घेतली. त्यांनी पोलिसांना फोन केला. पोलिसांनी १० मिनिटांत घटनास्थळी धाव घेतली. त्याअगोदरच चोरट्यांनी तेथून पळ काढला. यावेळी २० हजार रुपयांचे दागिने चोरीस गेले. याप्रकरणी शांताबाई भावले यांनी फिर्याद दिली आहे. दरोड्याची माहिती मिळताच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. अधिक तपास पोलीस करीत आहे.

Web Title: Theft in karanji killed and a woman was seriously injured in the robbery

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here