Home क्राईम संगमनेरात गोडाऊन फोडून लाखो रुपयांच्या इलेक्ट्रिक सामानाची चोरी

संगमनेरात गोडाऊन फोडून लाखो रुपयांच्या इलेक्ट्रिक सामानाची चोरी

Sangamner Theft: अज्ञात चोरट्याने पत्र्याचे गोडाऊन फोडून गोडाऊन मधील सुमारे १ लाख ८ हजारांच्या इलेक्ट्रिक सामानाची चोरी केल्याची घटना.

theft of electrical goods worth lakhs of rupees by breaking into a godown

संगमनेर: अज्ञात चोरट्याने पत्र्याचे गोडाऊन फोडून गोडाऊन मधील सुमारे १ लाख ८ हजारांच्या इलेक्ट्रिक सामानाची चोरी केल्याची घटना गुरुवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास संगमनेर महाविद्यालयात जवळ घडली.

याबाबत शहर पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की, नाशिक-पुणे महामार्गावरील संगमनेर महाविद्यालयाच्या समोर असणारे दत्तकृपा ट्रेडर्स नावाचे पत्र्याचे गोडाऊन अज्ञात चोरट्याने फोडले. त्यांनी या दुकानामधील मल्टीप्लॅब कंपनीचे एलईडी स्ट्रीप व स्टील कॉक, असे एकूण एक लाख आठ हजार रुपयांचे सामान चोरले. याप्रकरणी विजय नवले (रा. झोळे) यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक माळी हे करीत आहे.

Web Title: theft of electrical goods worth lakhs of rupees by breaking into a godown

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here