Home क्राईम संगमनेर: ग्रामीण रुग्णालयात साडे बारा लाखांची चोरी

संगमनेर: ग्रामीण रुग्णालयात साडे बारा लाखांची चोरी

Sangamner Crime: ग्रामीण रुग्णालयातील ऑक्सिजन जनरेशन प्रकल्पातून 12 लाख 61 हजार 29 रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लांबविल्याची (Theft) घटना.

Theft of twelve and a half lakhs in a rural hospital

संगमनेर : संगमनेर तालुक्यात चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच आहे. शहराजवळील घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयातील ऑक्सिजन जनरेशन प्रकल्पातून 12 लाख 61 हजार 29 रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लांबविल्याची घटना समोर आली आहे.  यामुळे वैद्यकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, रुग्णांना ऑक्सिजन पुरविण्यासाठी करोना काळात सरकारने ऑक्सिजन जनरेशन प्रकल्प उभारला होता. या प्रकल्पातून तब्बल 12 लाख 61 हजार 29 रुपयांचे तांब्याचे पाईप आणि ऑक्सिजन आउटलेट टर्मिनल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले आहेत. याप्रकरणी परिसेविका शकुंतला आसाराम पालवे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली आहे. अधिक तपास पोलीस करीत आहे.

Web Title: Theft of twelve and a half lakhs in a rural hospital

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here