Home अहमदनगर Theft: चोरट्यांनी एटीएम मशीन बोलेरोला बांधून नेले

Theft: चोरट्यांनी एटीएम मशीन बोलेरोला बांधून नेले

Theft tied up the ATM machine Bolero

पारनेर | Theft: पारनेर तालुक्यातील जवळे बसस्थानकापासून तेथील चौकात असणाऱ्या इंडिया वन या कंपनीचे एटीएम मशीन बोलेरोला बांधून नेल्याची घटना घडली आहे. सुमारे ३ लाख रुपयांची चोरी झाली असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. याबाबत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

या परिसरातील महावितरणचे रोहित्र जळाल्याने वीज पुरवठा खंडित होत. त्यामुळे या भागातील सीसीटीव्ही बंद पडले होते. याचाच फायदा घेत चोरट्यांनी मंगळवारी रात्री एटीएम मशीन पळवून नेले. हा प्रकार बुधवारी सकाळी उघडकीस आला. पोलीस निरीक्षक घनश्याम बळप यांनी घटनास्थळी भेट दिली. पंचनामा करण्यात आला आहे. यावेळी परिसरातील काही दुकानांचे सीसीटीव्ही तपासले असता मंगळवारी रात्री १२.४५ वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी पांढऱ्या रंगाच्या बोलेरोला पाठीमागे एटीएम मशीन बांधून ओढत नेत असल्याचे दिसून आले आहे.  

Web Title: Theft tied up the ATM machine Bolero

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here