Home अहमदनगर खा. सुजय विखेंना गोळ्या घालण्याची धमकी देणारा अटकेत

खा. सुजय विखेंना गोळ्या घालण्याची धमकी देणारा अटकेत

Breaking News | Ahmednagar: खा. सुजय विखेंना गोळ्या घालण्याची धमकी दिल्याची ऑडिओक्लिप व्हायरल झाल्यानंतर अहमदनगर जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडाली होती.

Threatened to shoot Sujay Vikhe arrested

अहमदनगर:  खा. सुजय विखेंना गोळ्या घालण्याची धमकी दिल्याची ऑडिओक्लिप व्हायरल झाल्यानंतर अहमदनगर जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडाली होती. खा. सुजय विखे यांच्यासह महायुतीमधील नेते आक्रमक झाले होते.पोलिसांत धाव घेत या व्यक्तीला पकडण्यात येण्याची मागणी केली होती. अखेर पारनेर पोलिसांनी निवृत्ती गाडगे याला नवी मुंबईतून अटक केली आहे.

खा. सुजय विखेंना गोळ्या घालण्याची धमकी दिल्याची ऑडिओक्लिप व्हायरल झाली होती. याबाबत भाजपचे पारनेर तालुकाध्यक्ष राहुल शिंदे यांनी पोलिसांत फिर्याद दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला होता. पारनेर पोलिसांना आरोपी गाडगे हा नवी मुंबईत असल्याचे समजले. त्यांनी नवी मुंबईतील पथकाला याबाबत माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले आहे.

एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती की ज्यात खा. सुजय विखे यांना गोळ्या घालण्याची भाषा वापरली होती. त्यानंतर ज्यावर आरोप केला गेला तो गाडगे हा पंचायत समितीचा माजी सदस्य असल्याचे समजले. पण त्याने हे आरोप झटकून टाकत आपण शिंदे गटाचे असून लंके व राष्ट्र्रवादीचा आपला संबंध नसल्याचे म्हणाला होता.पोलीस आता आरोपीकडून विविध माहिती जाणून घेणार आहेत. हत्येचा कट कुणी रचला, या कटामध्ये कोणकोण सामील आहे ? हा कट कुठे रचला गेला ? याचा सूत्रधार कोण आहे याबाबत सर्व माहिती पोलीस घेणार आहेत. तसेच तो व्यक्ती कुणाकुणाला भेटला ? त्याला कोण कोण भेटले आदींची देखील तपासणी होणार आहे.

Web Title: Threatened to shoot Sujay Vikhe arrested

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here