Home क्राईम संगमनेर: बिबट्यांच्या अवयवांची विक्री करताना तिघे ताब्यात

संगमनेर: बिबट्यांच्या अवयवांची विक्री करताना तिघे ताब्यात

Sangamner Crime:  बिबट्यांचे दात, सुळे, मिशा यांची विक्री, वनखात्याच्या पथकाने तिघांना रंगेहात पकडल्याची (Arrested) घटना.

Three arrested for selling leopard parts

संगमनेर:  बिबट्यांचे अवयव बेकादेशीर विक्री करताना वनखात्याच्या पथकाने तिघांना रंगेहात पकडल्याची घटना शनिवारी तालुक्यातील चंदनापुरी परिसरात घडली.

 

बिबट्यांच्या अवयवांची विक्री केल्याप्रकरणी वन खात्याने श्रीराम यादव सरोदे (वय ३४), सुधिर विजय भालेराव (वय ३०) (फरार आरोपी) सुशांत उत्तम भालेराव सर्व राहणार (आनंदवाडी), ता. संगमनेर यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद केला.

संगमनेर तालुक्यात बिबट्यांच्या अवयवाची विक्री होत असल्याची माहिती वन खात्याला मिळालेली होती. शुक्रवारी तालुक्यातील चंदनापुरी येथील आनंदवाडी परिसरात बिबट्यांचे दात, सुळे, मिशा यांची विक्री होणार असल्याची गोपनीय माहिती वन खात्याला मिळाली.

बिबट्यांच्या अवयवाची विक्री होत असल्याची खातरजमा करण्यासाठी वन खात्याच्या पथकाने सापळा रचला रचला. या पथकातील कर्मचारी बनावट ग्राहक बनुन आनंदवाडी येथे संबंधित आरोपींना भेटले. हे आरोपी या पथकाच्या जाळ्यात अलगद अडकले.

अधिक तपास उपविभागीय वन अधिकारी संदिप पाटील आणि उपवनसंरक्षक जुन्नर अमोल सातपुते व योगेश वरखड यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे. वनपरिक्षेत्र संगमनेर भाग-१ चे श्री. सचिन लोंढे, वनविभाग जुन्नर व W.C.C.B यांची टिम, रईस मोमिन, संदिप येवले, कुणाल घुले, तन्मय बागल, हारुन सव्यद, विक्रांत बुरांडे, अरुण देशमुख, गजानन पवार यांनी कार्यवाही केली.

Web Title: Three arrested for selling leopard parts

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here