Home नाशिक नगरपरिषदेच्या तलावात बुडून तिघांचा मृत्यू

नगरपरिषदेच्या तलावात बुडून तिघांचा मृत्यू

Three died after drowning in municipal pond igatpuri: इगतपुरी येथील नगरपरिषदेच्या तलावात बुडून तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना.

Three-died-after-drowning-in-municipal-pond-igatpuri

नाशिक:  इगतपुरी येथील नगरपरिषदेच्या तलावात बुडून तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. इगतपुरी तालुक्यातील घोटी देवळे परिसरातील दारणा नदीपात्रात मासेमारी करण्यासाठी गेलेल्या दोघा भावंडांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच शनिवारी पुन्हा एकदा घटना घडली आहे. या घटनेनंतर इगतपुरीच्या ग्रामीण रुग्णालयात पुरेशा वैद्यकीय सुविधा उपलब्ध नसल्याने तिघांचा मृत्यू झाल्याचा आरोप करत मृतांच्या नातेवाइकांनी रुग्णालयासमोर काही काळ ठिय्या आंदोलन करत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. परंतु पोलिसांच्या मध्यस्थीनंतर मृतदेह नातेवाइकांकडे सोपविण्यात आले.

याबाबत अधिक माहिती अशी की, इगतपुरी येथील रहिवासी शाहनवाज कादिर शेख (वय ४१) यांच्याकडे भिवंडी येथील त्यांचे दोन्ही मामेभाऊ व काही नातेवाईक पाहुणे म्हणून आले होते. शनिवारी त्यांचा पाहुणचार करून सकाळी १० वाजता सर्वजण नगरपरिषद तलाव परिसरात फिरण्यासाठी गेले असता रमीझ अब्दुल कादिर शेख (३६) व नदीम अब्दुल कादिर शेख (३४, दोन्ही रा. भिवंडी, जि. ठाणे) हे तलावाच्या पाण्यात कडेला उभे राहन फोटो काढत यांचा मृत्यू झाला. याचवेळी दोघांचा तोल गेल्याने ते तलावाच्या पाण्यात पडले. दोघे पाण्यात बुडत असल्याचे पाहून शाहनवाज यांनी दोघांना वाचविण्यासाठी पाण्यात उडी घेतली. परंतु ते देखील पाण्यात बुडाल्याने सोबत असलेल्या कुटुंबातील सदस्यांनी आरडाओरडा केला. यावेळी परिसरातील काही युवकांनी तलावात उड्या घेत तिघांना बाहेर काढले. तिघांना इगतपुरीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, उपचार सुरू असतानाच रमीझ शेख, नदीम शेख व शाहनवाज शेख यांचा मृत्यू झाला.

Web Title: Three died after drowning in municipal pond igatpuri

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here