Drowned: सेल्फीच्या नादात तिघांचा तलावामध्ये बुडून मृत्यू
वडवणी: माहेरी आलेल्या मुलीसह तिचा पती व पतीच्या मित्राचा सेल्फीच्या नादात तलावात बुडून (drowned) मृत्यू झाल्याची घटना कवडगाव ता. वडवणी येथे शनिवारी सायंकाळी घडली.
ताहा शेख वय २२ या कवडगाव येथील मुलीचा ढाकरगाव ता. अंबड जि. जालना येथील सिद्धिक शेख यांच्याशी काही महिन्यांपूर्वी विवाह झाला होता. शनिवारी हे नवदाम्पत्य कवडगाव येथे आले होते. सोबत शहाब शेख रा. बिहार हा देखील होता. शनिवारी सायंकाळी हे तिघे गावातील तलाव परिसरात फिरण्यासाठी गेले होते. सेल्फी काढण्यासाठी तिघे तलावात गेले. फोटो काढण्याच्या नादात तिघांचाही तलावात बुडून मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच वडवणी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह तलावातून बाहेर काढण्यात आले.
Web Title: Three drowned in a lake while taking selfies