Home महाराष्ट्र Accident: कार पलटी होऊन झालेल्या अपघातात तिघे ठार

Accident: कार पलटी होऊन झालेल्या अपघातात तिघे ठार

Satara Accident News: गाडीचा ताबा सुटल्याने ही गाडी पलटी झाली. या भीषण अपघातामध्ये मृत्यू.

Three killed in a car overturn accident

सातारा: कार पलटी होऊन झालेल्या भीषण अपघातात (Accident)  तीन जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. काल रात्री ही घटना घडली आहे. तिघे मृत आर्वी (ता. कोरेगाव) येथील आहेत.

आर्वी (ता .कोरेगाव) येथील तुकाराम आबाजी माने (वय 65 ), तानाजी आनंद माने (वय 62), सुभाष गणपत माने (वय 60) हे तिघेजण साताराहून  आर्वीकडे येत असताना सुर्ली गावानजीक असलेल्या वळणावर गाडीचा ताबा सुटल्याने ही गाडी पलटी झाली. या भीषण अपघातामध्ये तिघेजण गंभीर जखमी झाली होते.

जखमी झालेल्या तिघांना वाठार किरोली येथील युवकांनी सातारा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र रस्त्यातच या तिघांचा दुर्दैवी अंत झाला. आर्वी येथील तीन जणांचा अकाली अपघाती मृत्यू झाल्याने गावावर शोककळा पसरली आहे.

Web Title: Three killed in a car overturn accident

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here