Home अकोले संगमनेर अकोले तालुक्यातील तिघे जण तीन जिल्ह्यातून हद्दपार

संगमनेर अकोले तालुक्यातील तिघे जण तीन जिल्ह्यातून हद्दपार

Sangamner Akole Deported: अहमदनगर, पुणे, नाशिक या तीन जिल्ह्यातून तीन सराईत गुन्हेगारांना एक वर्षाकरिता हद्दपार.

Three people from Sangamner Akole taluka deported

संगमनेर: संगमनेर उप विभागातील संगमनेर शहर पोलीस स्टेशन, तालुका पोलीस स्टेशन, अकोले पोलीस स्टेशन हद्दीतील सराईत गुन्हेगारांना पोलीस उप अधीक्षक राहुल मदने यांनी एक वर्षाकरिता तिघांना हद्दपार केले आहे. अहमदनगर, पुणे, नाशिक या तीन जिल्ह्यातून तीन सराईत गुन्हेगारांना एक वर्षाकरिता हद्दपार करण्यात आले आहे. असा आदेश उपविभागीय अधिकारी राहुल मदने यांनी १ सप्टेंबर २०२२ रोजी काढला आहे.

१) अविनाश विलास देवकर (राहणार घुलेवाडी, तालुका संगमनेर) याच्याविरुद्ध चोरी, घरफोडी, जबरी चोरी, दारू विक्री, असे अनेक गुन्हे दाखल असल्याने त्यास हद्दपार करण्यात आले आहे

२) समाधान बाळासाहेब सांगळे (राहणार चिंचोली गुरव, तालुका संगमनेर) याच्याविरुद्ध दरोडा, घरफोडी, गैरकायद्याची मंडळी जमून मारहाण करणे, शेतकन्यांना मारहाण करणे अशा प्रकारचे विविध गुन्हे दाखल आहेत त्यालाही हदपार करण्यात आले आहे.

३) जनार्दन कमलाकर नवले (राहणार नवलेवाडी तालुका अकोले) याच्याविरुद्ध मारहाण, जातीवाचक शिवीगाळ, विनयभंग, दुखापत असे अनेक गुन्हे दाखल असल्याने त्याला सुद्धा हद्दपार करण्यात आले आहे

अविनाश विलास देवकर, जनार्दन कमलाकर नवले, समाधान बाळासाहेब सांगळे या तिघांना एक वर्षा करिता अहमदनगर, नाशिक, पुणे जिल्हयातून हद्दपार करण्यात आले आहे.

Web Title: Three people from Sangamner Akole taluka deported

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here