Home अहमदनगर राहता तेथील तिघे युवक मित्र बेपत्ता

राहता तेथील तिघे युवक मित्र बेपत्ता

Three young friends went missing while living there

Rahata | राहता: दहावीचा निकाल निकाल आणण्यासाठी मोटारसायकलवर दोन मित्रांसह बाहेर पडलेला १६ वर्षीय युवक बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. राहता येथे ही घटना घडली आहे.

राहाता येथील खंडोबा चौकातील दीपक विजय मोरे (वय 16), गणेश दिलीप बर्डे (वय 17), किसन रमेश कुर्‍हाडे (वय 17) अशी बेपत्ता असलेल्या युवकांची नावे आहेत.

याबाबत  दीपक मोरे याचे वडील विजय पुंडलिक मोरे यांनी राहाता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 17 जून रोजी दीपक विजय मोरे हा दहावीची परीक्षा दिलेला विद्यार्थी सकाळी 7 च्या सुमारास दाहवीच्या बोर्डाचा निकाल आणतो असे सांगून आपल्या मोटारसायकलवरून की जी नुकतीच घेतली होती.

ती बिगर नंबरची आहे. होंडा कंपनीची ग्रे रंगाची मोटारसायकलवरून तो आपले मित्र गणेश दिलीप बर्डे, व किसन रमेश कुर्‍हाडे यांचेसह बाहेर पडला असता त्यांना कुणी तरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणासाठी आमचे कायदेशीर रखवालीतून पळवून नेले. त्यांचा शोध घेतला असता ते कोठेही मिळून आले नाहीत. अशी फिर्याद विजय पुंडलिक मोरे यांनी राहाता पोलीस ठाण्यात दिली आहे. पोलिसांनी गुन्हा रजि. क्रमांक 264/ 2022 भादवि कलम 363 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास राहाता पोलिस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल दिलीप तुपे करत आहेत.

Web Title: Three young friends went missing while living there

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here