Home अकोले अकोले: सावकारी जाचास कंटाळून तरुणाची आत्महत्या

अकोले: सावकारी जाचास कंटाळून तरुणाची आत्महत्या

Akole News:  तालुक्यातील उंचखडक खुर्द येथील विवाहित युवकाने आपल्या शेत बांधावरील झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना.

Tired of Moneylenders, young man commits suicide

अकोले : तालुक्यातील उंचखडक खुर्द येथील विवाहित युवकाने आपल्या शेत बांधावरील झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. मंगळवारी सकाळी ९:४० वाजण्यापूर्वी हि घटना घडली असून अकोले पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अनिल भास्कर राक्षे (वय ३०) असे या विवाहित युवकाचे नाव आहे.

नातेवाईक यांचा आरोप:

अवैध सावकारांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचा गावकरी नातेवाईक यांचा आरोप असून, मयताचे खिशात काही चिठ्ठी होती का? असल्यास योग्य तपास करून कारवाई व्हावी, अशी मागणी केली जात आहे.

याबाबत माहिती अशी की, व्यापार उद्योगानिमित्त अनिल हे आपल्या पत्नी व मुलासोबत अकोले शहरात राहत होते. मंगळवारी सकाळी ते आपल्या गावी उंचखडक खुर्द येथे गेले. तेथे शेत बांधावरील झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. हरिभाऊ निवृत्ती राक्षे यांचे खबरीवरून अकोले पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Web Title: Tired of Moneylenders, young man commits suicide

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here