Home महाराष्ट्र भरधाव जीपचे टायर फुटले, अपघातात सिन्नरचे तिघे ठार

भरधाव जीपचे टायर फुटले, अपघातात सिन्नरचे तिघे ठार

देवीच्या दर्शनासाठी तुळजापूरकडे येत असताना टायर फुटून भरधाव जीप रस्त्यालगतच्या खड्ड्यात पडली. या भीषण अपघातात (Accident) सिन्नर तालुक्यातील तिघे जण जागीच ठार.

tires of the speeding jeep burst, three of Sinnar were killed in the accident

धाराशिव: श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी तुळजापूरकडे येत असताना टायर फुटून भरधाव जीप रस्त्यालगतच्या खड्ड्यात पडली. या भीषण अपघातात सिन्नर तालुक्यातील तिघे जण जागीच ठार झाले. तर अन्य सहा जण जखमी आहेत. ही घटना मंगळवारी सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास तुळजापूर तालुक्यातील तामलवाडीनजीक घडली.

जीपने श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी येत होते. त्यांची जीप तामलवाडीनजीक आली असता, अचानक जीपचे टायर फुटले. यानंतर ही जीप रस्त्यालगत असलेल्या खड्डयात कोसळली. या भीषण अपघातात निखिल रामदास सानप (२२), अनिकेत बाळासाहेब भाबड (२४) आणि अथर्व शशिकांत खैरनार (२६, सर्व रा. चास, ता. सिन्नर) हे तिघे जण जागीच ठार झाले. दीपक बबन नाशिक जिल्ह्यातील सिन्नर बिडगर (२३), तुषार दत्तात्रय बिडगर तालक्यातील चास येथील भाविक (29) हे गंभीर जखमी आहेत

Web Title: tires of the speeding jeep burst, three of Sinnar were killed in the accident

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here