सर्वोदय विद्यालय राजूर येथे आदिवासी दिन साजरा
Rajur News: सत्यानिकेतन संस्थेचे सचिव टी. एन. कानवडे यांनी सुरुवातीलाच आदिवासी दिनाच्या शुभेच्छा दिल्या. (Tribal Day Celebration)
राजूर: जागतिक आदिवासी दिनानिमित्त येथील गुरुवर्य रा. वि. पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला सत्यानिकेतन संस्थेचे सचिव टी.एन. कानवडे अध्यक्ष म्हणून लाभले. या कार्यक्रमात विद्यालयातील विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या वेशभूषा करून सामील झाले होते. येथे पारंपरिक नृत्य प्रकारही सादर करण्यात आले.
सत्यानिकेतन संस्थेचे सचिव टी. एन. कानवडे यांनी सुरुवातीलाच आदिवासी दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच, 9 ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त स्वातंत्र्यसैनिक व त्यांच्या कुटुंबीयांना अभिवादन केले. कानवडे म्हणाले की, आदिवासी हा निसर्गाचे रक्षण करणारा एक जबाबदार घटक आहे. देशात ९ ऑगस्ट हा दिवस आदिवासी दिन म्हणून साजरा होतो. तर जगभरात मूलनिवासी दिन म्हणून साजरा होतो. जल, जमीन आणि जंगल वाचवण्याचे काम आदिवासींनी केले आहे. बिरसा मुंडे यांनी जल, जमीन आणि जंगलाच्या रक्षणासाठी इंग्रजांना सळो की पळो करून सोडले, असेही कानवडे म्हणाले.
पारंपारिक वेशभूषा, पारंपारिक नृत्य, आणि घोषणांच्या निनादात हजारो विद्यार्थी व शिक्षकांच्या सहभागातून भव्य जनजागृती मेळावा व रॅली राजूर गावात संपन्न झाली. झालेल्या रॅलीमध्ये शालेय विद्यार्थ्यांनी पारंपारिक वेशभूषा करून आदिवासी नृत्य सादर केली.
आदिवासींच्या विकासासाठी सत्यानिकेतन संस्थेने सातत्याने काम केले असल्याचे प्रतिपादन विद्यालयाचे प्राचार्य बी. के. बनकर यांनी केले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सत्यनिकेतन संस्थेचे सचिव टी.एन.कानवडे यांनी स्वीकारले. या कार्यक्रमासाठी सत्यनिकेतन संस्थेचे संचालक व्ही.टी. पाबळकर व विजय पवार प्राचार्य बी.के. बनकर, उपप्राचार्य ए.एफ.धतुरे ,पर्यवेक्षक सदाशिव गिरी व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
Web Title: Tribal Day Celebration at Sarvodaya Vidyalaya Rajur
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App