Home लाइफस्टाइल भूक वाढविण्यासाठी घरगुती आयुर्वेदिक उपाय | Increase Appetite

भूक वाढविण्यासाठी घरगुती आयुर्वेदिक उपाय | Increase Appetite

Try this to increase appetite

भूक न लागणे, जेवण न जाणे अशा तक्रारी अनेकांना असतात. भूक न लागण्याची कारणे मानसिक आणि शारीरिक असू शकतात. भूक लागत नसेल तर तो नक्कीच चिंतेचा विषय आहे. भूक न लागण्याच्या समस्यांकडे दुर्लक्ष न करता वैद्यकीय सल्ल्यानुसार उपाय करावेत.

भूक वाढविण्यासाठी घरगुती आयुर्वेदिक उपाय | Try this to increase appetite

  • आपण भूक वाढविण्यासाठी (increase appetite) काही घरगुती आयुर्वेदिक उपाय पाहणार आहोत.
  • जास्तीत जास्त काकड्या खाव्यात
  • जेवणानंतर कवठाचे सरबत प्यावे
  • रात्रभर तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी रोज सकाळी तोंड न धुता प्यावे.
  • ग्लासभर कोमट पाणी अनाशेपोटी रोज नियामीत प्यावे.
  • जेवणाच्या आधी आल्याचा तुकडा व गुळ एकत्र करून खावे.
  • जेवानाच्या आधी आल्याचा तुकडा मिठाबरोबर खावा.
  • भाजलेला कांदा नियमित काही दिवस खावा.
  • कच्चा पपईची भाजी रोजच्या आहारात असावी.
  • भरपूर सिताफळे खावीत.
  • डाळींबाचा वस्त्रगाळ रस जेवानानंतर घ्यावा.
  • पिंपळीचे २० ग्राम चूर्ण जेवणाबरोबर काही दिवस खावे.
  • पिंपळीचे २० ग्राम चूर्ण मधात कालवून जेवणानंतर सात दिवस चाटावे.
  • पिकलेली पपई जेवणानंतर नियमित १५ दिवस खावी.
  • पिंपळाचे चिमुटभर चूर्ण गुळाबरोबर रोज सकाळी १४ दिवस खावे.
  • ग्लासभर पाण्यात १ लिंबूचा रस, अर्धा ग्राम सैधव व पाव ग्राम हिंग पावडर मिसळून जेवणापूर्वी काही दिवस नियमित घ्यावे.
  • अर्धा चमचा आल्याचा रस व अर्धा चमचा मध एकत्र करून दोन्ही जेवणानंतर काही दिवस चाटावे.
  • कोवळा मुळा पाण्यात उकळून, गाळून कपभर काढा बनवावा. त्यात पिंपळी पावडर मिसळून रोज सकाळ संध्याकाळ नियमित सात दिवस प्यावा.
  • कवठाचा गर गुळात मिसळून दिवसभर अधून मधून खावा.
  • आठवड्यातून दोन तीन वेळा मेथीची पालेभाजी खावी.
  • जेवणानंतर १५ मिनिटे आधी अर्ध्या लिंबूच्या रसात शेंदेलोण पावडर मिसळून नियमित १५ दिवस प्यावे.
  • वेखंडाची वस्त्रगाळ पावडर एरंडतेलात मिसळून पोटावर लेप लावावा.
  • ओव्याचे २५ ग्राम फुल ग्लासभर पाण्यात एकजीव करून रात्री प्यावे.
  • तापानंतर भूक वाढविण्यासाठी: १ चमचा जिरे रात्री भिजत टाकावे. सकाळी त्याच पाण्यात कुस्करून वस्त्रगाळ करावे. हे पाणी सकाळी अनाशेपोटी खडीसाखर टाकून नियमित ७ दिवस प्यावे.
  • चमचाभर काकवीत अर्धा चमचा पिंपळीचे चूर्ण मिसळून रोज सकाळ संध्याकाळ नियमित सात दिवस चाटावे.
  • तुळशीची १० पाने वाटून पाण्याबरोबर, जेवणानंतर नियमित १५ दिवस खावी.
  • आंब्याचा ५० ग्राम रस थोडे मीठ मिसळून सकाळी प्यावा

Download App : Sangamner Akole News

See Also: Health Benefits of Amla in Marathi: आवळा खाण्याचे फायदे

Web Title: Try this to increase appetite

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here