Home संगमनेर संगमनेर: शेततळ्यात घसरून पडलेल्या दोघा भावांचा मृत्यू

संगमनेर: शेततळ्यात घसरून पडलेल्या दोघा भावांचा मृत्यू

Breaking News | Sangamner: दोन सख्ख्या भावांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना.

Two brothers died after falling in the farm

संगमनेर :तालुक्यातील हिवरगाव पावसा येथे दुर्दैवी घटना समोर आली आहे.  खेळताना पाय घसरून शेततळ्यात पडलेल्या दोघा भावांचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (दि.१७) घडली. या प्रकरणी संगमनेर तालुका पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या दुःखद घटनेने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

रितेश सारंगधर पावसे (वय १२), प्रणव सारंगधर पावसे (वय ८) अशी मृत्यू झालेल्या दोघा सख्ख्या भावांची नावे आहेत. ते दोघेही हिवरगाव पावसा येथे कुटुंबासमवेत राहत होते. शाळेला सुटी असल्याने रितेश आणि प्रणव हे दोघे खेळण्यासाठी गेले होते. ते खेळता खेळता शेततळ्याजवळ पोहोचले. खेळत असताना त्यांचा पाय घसरल्याने ते शेततळ्यात पडले. हा प्रकार काहींचा लक्षात येताच त्यांना पाण्यातून बाहेर काढत संध्याकाळी ६ वाजून ५ मिनिटांनी बेशुद्ध अवस्थेत उपचारांसाठी संगमनेर शहरानजीक असलेल्या घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. तेथील डॉक्टरांनी त्यांना तपासून त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे घोषित केले.

घटनेची माहिती मिळताच तालुका पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक देवीदास ढुमणे-पाटील, पोलिस उपनिरीक्षक एस. एस. सातपुते यांनी घटनास्थळी भेट दिली.

Web Title: Two brothers died after falling in the farm

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here