Home Accident News संगमनेर: कोल्हार-घोटी राज्य मार्गावर पिकअप, ट्रॅक्टर आणि दुचाकीच्या विचित्र अपघातात दोघा भावांचा...

संगमनेर: कोल्हार-घोटी राज्य मार्गावर पिकअप, ट्रॅक्टर आणि दुचाकीच्या विचित्र अपघातात दोघा भावांचा मृत्यू

Ahmednagar Accident: पिकअप, ट्रॅक्टर आणि दुचाकीच्या विचित्र अपघातात संगमनेर तालुक्यातील वडगाव पान येथील चुलत भाऊ जागीच ठार.

Two brothers killed in freak accident involving pickup, tractor

संगमनेर | Sangamner: कोल्हार-घोटी राज्य मार्गावर संगमनेर तालुक्यातील मांची फाटा येथे शुक्रवारी दुपारी दोन वाजण्याचा सुमारास पिकअप, ट्रॅक्टर आणि दुचाकीच्या विचित्र अपघातात संगमनेर तालुक्यातील वडगाव पान येथील चुलत भाऊ जागीच ठार झाले. या अपघातामुळे वडगावपान गावावर शोककळा पसरली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शुक्रवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास संगमनेर तालुक्यातील मांची फाटा येथे भीषण अपघात झाला. लोणीहून संगमनेरच्या दिशेने जाणारी पिकअप गाडी व मांची फाट्याकडे भरधाव वेगातील वळण घेत असलेला ट्रॅक्टर या दरम्यान लोणीहून संगमनेरकडे जाणारी दुचाकीस यांचा विचित्र अपघात झाला. या अपघातात वडगावपान येथील एकमेकांचे चुलत भाऊ असलेले आकाश विलास कुळधरण (वय-२३) आणि ऋषिकेश विजय कुळधरण (वय २०) हे दोन तरुण जागीच ठार झाले.

Business Idea | कार मधून कसे पैसे कमवतात | Car Business Earn Money

अपघाताची माहिती मिळाल्यावर पोलिस निरीक्षक अरुण आव्हाड आणि त्यांचे सहकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. अपघात झाल्यानंतर पिकअप चालक पसार झाला. त्यामुळे पोलिस निरीक्षक आव्हाड यांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून पिकअपचा आणि चालकाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी संगमनेर तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास तालुका पोलिस करीत आहेत.

Web Title: Two brothers killed in freak accident involving pickup, tractor

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here