Home Accident News अहमदनगर: ट्रॅक्टरच्या धडकेत दोन ठार एक जखमी

अहमदनगर: ट्रॅक्टरच्या धडकेत दोन ठार एक जखमी

Ahmednagar Accident news: भरधाव ट्रॅक्टरच्या धडकेतील दुचाकीवरील दोघे जागीच ठार झाले तर एकजण गंभीर जखमी.

Two killed and one injured in tractor collision Accident

कोपरगाव:  भरधाव ट्रॅक्टरच्या  धडकेतील दुचाकीवरील दोघे जागीच ठार  झाले तर एकजण गंभीर जखमी  झाल्याची घटना घडली आहे. जखमीला शिर्डी येथील साईबाबा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

लालसिंग गहू डावर (वय 35) व दिलीप छगन जाधव (वय 23) अशी अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत. रायमल जामसिंग तरोळे (रा. दोनवाडा, जि. बडवाणी, मध्यप्रदेश, ह. मु. नाटेगाव, ता. कोपरगाव) असे जखमी व्यक्तीचे नाव आहे.

ब्राह्मणगाव येथील गुरुवारचा आठवडी बाजार करून लालसिंग डावर, दिलीप जाधव व रायमल तरोळे हे तिघे एमएच 17 बीसी 5025 क्रमांकाच्या दुचाकीवरून नाटेगावकडे जात होते. यावेळी समोरून येणार्‍या ट्रॅक्टरने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात लालसिंग डावर व दिलीप जाधव हे जागीच ठार झाले, तर रायमल तरोळे गंभीर जखमी झाले. जखमी तरोळे यांना शिर्डी येथील साईबाबा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

शुक्रवारी ग्रामीण रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. घटनास्थळावरून ट्रॅक्टर चालक फरार झाला आहे. याप्रकरणी रायमल तरोळे यांच्या फिर्यादीवरून ट्रॅक्टर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सपोनि. आंधळे करीत आहेत.

Web Title: Two killed and one injured in tractor collision Accident

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here