Home Accident News अहमदनगर ब्रेकिंग: भरधाव कार झाडावर आदळून भीषण अपघातात दोघे ठार

अहमदनगर ब्रेकिंग: भरधाव कार झाडावर आदळून भीषण अपघातात दोघे ठार

Ahmednagar News: भरधाव वेगातील कार झाडावर आढळून झालेल्या भीषण अपघातात (Accident) दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली.

Two people were killed in a horrific accident when a speeding car crashed

अहमदनगर: भरधाव वेगातील कार  झाडावर आढळून झालेल्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. नगर- दौंड महामार्गावरील पांजरपोळ संस्थेजवळ आज सोमवारी दुपारी ही घटना घडली. या अपघातात तीन जण जखमी  झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

साहिल सादिक शेख (रा. बुरूडगाव रस्ता), संतोष मोरे (रा. चिपाडे मळा) अशी मयत झालेल्यांची नावे आहेत. तर विकी राजू कांबळे (वय 22 रा. रांजनी माथणी, ता. नगर), तेजस राजेंद्र ठोंबे (रा. खांडके) व आणखी एक अशा तिघांचा जखमींमध्ये समावेश आहे.

याबाबत माहिती अशी की, काळ्या रंगाच्या चारचाकी वाहनातून पाच जण नगर – दौंड महामार्गावर नगरच्या दिशेने येत होते. भरधाव वेगात असलेल्या कारच्या चालकाचे नियंत्रण सुटून कार विरूध्द दिशेला जाऊन मोठ्या झाडावर आदळली. यात कारचा पूर्णपणे चक्काचूर झाला. त्यातील दोघे जागीच ठार झाले.

Web Title: Two people were killed in a horrific accident when a speeding car crashed

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here