Home महाराष्ट्र एकाच दिवशी तीन अल्पवयीन मुलींचा मृत्यूने खळबळ

एकाच दिवशी तीन अल्पवयीन मुलींचा मृत्यूने खळबळ

two Suicide of the death of three minor girls on the same day

बीड: काल एकाच दिवसात तीन ठिकाणी अल्पवयीन मुलींच्या मृत्यूच्या (Death) घटना समोर आल्याने बीड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. यामधील दोघीजणी दहावीची परीक्षा देत होत्या, त्यांनी आत्महत्या (Suicide) केली आहे. यात एका विद्यार्थिनीने छेडछाडीला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप नातेाइकांनी केला, तर आणखी एका मुलीचा मृतदेह आढळून आला आहे. या तीनही मृत्युमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

पहिली घटना:-

बीड शहरातील छत्रपती कॉलनी भागात राहणारी सृष्टी काळे (वय 16) या विद्यार्थिनीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याचे काल उघडकीस आले आहे. सृष्टी ही दहावीची परीक्षा देत होती. तिच्या आत्महत्येचे कारण आणखी समोर आलेले नाही. बीडच्या छत्रपती कॉलनीत ती मामाकडे राहत होती.तिचे आणखीन तीन विषयाचे पेपर बाकी आहेत. रात्रीच्या सुमारास घरातील पंख्याला लटकलेल्या अवस्थेत सृष्टीचा मृतदेह आढळून आला.  नातेवाईकांनी पोलिसांना माहिती दिल्यावर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. दरम्यान पोलिसांनी सृष्टीचा मोबाईल हस्तगत केला असून सृष्टीची हत्या आहे की आत्महत्या ? याबाबत अधिक तपास शिवाजीनगर पोलीस करीत आहेत.

दुसरी घटना: –

गेवराई तालुक्यातील दिमाखवाडी दहावीच्याच भाग्यश्री भोईटे (वय 17) या विद्यार्थिनीने छेडछाडीला कंटाळून आत्महत्या केली आहे. भाग्यश्री देखील दहावीची परीक्षा देत होती आणि काही दिवसांपासून एक तरुण तिची छेड काढीत होता, त्यातूनच तिने आत्महत्या केल्याचे भाग्यश्रीच्या नातेवाईकांनी पोलिसात सांगितले आहे.

तिसरी घटना:-

गेवराई तालक्यातील रेवकी येथील मयुरी नवनाथ चव्हाण (वय 14) या मुलीचा मृतदेह तिच्या घरासमोरच्या बाजेवर मृतावस्थेत (Dead body) आढळून आला. मयुरी रात्री घरासमोर झोपली होती, सकाळी ती उठलीच नाहीं. त्यामुळे मयुरीच्या मृत्यु संदर्भात संशय व्यक्त होत असून असून अद्याप मृत्यूचे कारण समोर आलेले नाही. अधिक तपास गेवराई पोलीस करत आहे.

Web Title: two Suicide of the death of three minor girls on the same day

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here