Home संगमनेर संगमनेर: महिलावर अत्याचार करणारे दोन शिक्षक निलंबीत

संगमनेर: महिलावर अत्याचार करणारे दोन शिक्षक निलंबीत

Sangamner abusing woman: एका शाळेतील ३६ वर्षीय शिक्षकाने राहुरी येथील ४१ वर्षीय शिक्षिकेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केले होते.

Two teachers suspended for abusing women

संगमनेर: जिल्हा परिषदेच्या संगमनेर तालुक्यातील एका शाळेतील ३६ वर्षीय शिक्षकाने राहुरी येथील ४१ वर्षीय शिक्षिकेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केले होते. गर्भधारणा झाल्याने महिलेचा गर्भपातही त्याने केला होता. २५ जून ते १८ ऑगस्टदरम्यान शिक्षकाने अत्याचार केले. तसेच दुसऱ्या एका शिक्षकाने पीडित महिलेला जीवे मारण्याची धमकी दिली होती. जिल्हा परिषदेच्या शाळांतील या दोन्ही शिक्षकांना निलंबित करण्यात आले आहे.

योगेश अण्णासाहेब थोरात (रा. घुलेवाडी, ता. संगमनेर) असे अत्याचार करणाऱ्या शिक्षकाचे, तर गणेश रख्मा शेंगाळ (रा. संगमनेर) असे पीडित शिक्षिकेला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या शिक्षकाचे नाव आहे. थोरात हा जिल्हा परिषदेच्या संगमनेर तालुक्यातील हरीबाबावाडी येथील शाळेत तर शेंगाळ हा तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या मालदाड गावातील शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांच्या विरुद्ध पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी सोमवारी (दि. ३) त्यांचे निलंबन केले. निलंबनाचे पत्र हरीबाबावाडी आणि ऑडिओ क्लिप व्हायरल एक ऑडिओ क्लिप समाजमाध्यमात व्हायरल झाली आहे. शिक्षक राजकारणी खालच्या स्तराला जाऊन एका महिलेवर आरोप करतील, याची कल्पना करवत नाही, योगेश थोरात याने माझ्यावर अत्याचार करत माझी फसवणूक केली आहे. इतरही महिलांची त्याने फसवणूक केली आहे. त्या महिला स्वतः मला भेटल्या आहेत. शिक्षक राजकारणी बातम्या देऊन अत्याचार करणायाला पाठीशी घालत आहेत. पीडित महिलेला साथ न देता एका फरार आरोपीला तुम्ही पाठीशी घालत आहात. सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने न्याय व्यवस्थेकडे न्यायाची मागणी केली आहे. त्यात कुणीही राजकारण करू नये, माझ्यावर आरोप करु नये. माझी बदनामी करू नये. यातून तुम्ही तुमचा राजकीय स्वार्थ साधत आहात. माझ्यावर बिनबुडाचे आरोप करणायांवरदेखील कायदेशीर कारवाई केली जाईल, असेही त्या ऑडिओ क्लिपमध्ये म्हटले आहे. मालदाड येथील शाळेच्या मुख्याध्यापकांकडे दिल्याचे संगमनेर पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी सुवर्णा फटांगरे यांनी सांगितले.

Web Title: Two teachers suspended for abusing women

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here