Home क्राईम दोन व्यापाऱ्यांची गोळ्या झाडून हत्या; पेट्रोलने मृतदेह जाळून फेकले नदीत

दोन व्यापाऱ्यांची गोळ्या झाडून हत्या; पेट्रोलने मृतदेह जाळून फेकले नदीत

Nagpur Crime: व्यापाऱ्यांच्या अंगावर पेट्रोल टाकून त्यांचे अर्धवट जळालेले मृतदेह (dead bodies) वर्धा नदीच्या पात्रात फेकले , पाच आरोपींना अटक : पैशाच्या व्यवहारातून केले क्रौर्य.

Two traders shot dead bodies were burnt with petrol and thrown into the river

नागपूर : नागपुरातील दोन व्यापाऱ्यांचे अपहरण करून त्यांच्यावर गोळ्या घालून हत्या करण्यात आली. यानंतर आरोपींनी दोन्ही व्यापाऱ्यांच्या अंगावर पेट्रोल टाकून त्यांचे अर्धवट जळालेले मृतदेह वर्धा नदीच्या पात्रात फेकले. या प्रकरणी पाच आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. पैशांच्या व्यवहारातून या हत्या करण्यात आल्याची बाब तपासात पुढे आली आहे.

निरालाकुमार सिंह व अंबरीश देवदत्त मृत व्यापाऱ्यांची नावे आहेत. आरोपीत ओंकार महेंद्र तलमले हर्ष आनंदीलाल वर्मा, आनंदीलाल वर्मा (वय २२, रा. वाडी), लकी संजय तुर्केल,  निरालाकुमार सिंह, हर्ष सौदागर आणि अंबरीश देवदत्त बागडे अशी गोळे  असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

निरालाकुमार व अंबरीश हे दोघेही एकमेकांचे मित्र होते. दोघांचेही हिस्लोप महाविद्यालयाजवळिल चिटणीस सेंटरजवळून आरोपींनी अपहरण केले. तेथून ते कोंडली येथील रिंगणाबोडी शिवारातील संजय तुर्केल याच्या फार्म हाउसवार गेले. तेथे पैशाच्या कारणावरून त्यांच्यात वाद झाला.  आरोपींनी दोन्ही व्यापाऱ्यांवर गोळ्या झाडून त्यांना जागीच ठार केले. त्यानंतर त्यांच्या मृतदेहावर पेट्रोल टाकून ‘अर्धवट जळालेले मृतदेह वर्धा नदीच्या पात्रात फेकून दिले.

कुजलेल्या स्थितीत आढळले मृतदेह

मृतदेहाचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तिवसा पोलिसांच्या मदतीने शोध मोहिम राबविली असता भारवाडीनजीक वर्धा नदीच्या दुसऱ्या टोकाला परतोडा (जि. वर्धा) हद्दीत एक मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. तर दुसरा मृतदेह खड़गा गावाजवळ आढळला. पेट्रोल टाकून मृतदेह पाण्यात फेकल्यामुळे दोघांचेही मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळले आहेत. तपास पोलिस अधिक्षक विशाल आनंद, अप्पर पोलिस अधिक्षक डॉ. संदिप पखाले यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी बापु रोहोम, कोंढाळीचे ठाणेदार पंकज वाघोडे करीत आहेत.

Web Title: Two traders shot dead bodies were burnt with petrol and thrown into the river

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here