Home अहमदनगर Accident | कारची मोटारसायकला धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

Accident | कारची मोटारसायकला धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

Two-wheeler killed in car-motorcycle Accident

पारनेर | Parner: नगर-कल्याण राष्ट्रीय महामार्गावर  सावरगाव येथील काळेवाडी शिवारात भरधाव इर्टिका कारने मोटारसायकला धडक दिल्याने मोटारसायकलस्वराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या अपघाताची (Accident) माहिती बाळासाहेब बांडे यांनी टाकळी ढोकेश्वर पोलीस दूरक्षेत्रात दिली आहे.

मिनीनाथ बाबासाहेब बांडे (वय 33, रा. टाकळी ढोकेश्वर, ता. पारनेर) असे या अपघात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

सावरगाव (ता. पारनेर) येथे सोमवारी (दि. 23) दुपारी अडीच वाजता इर्टिका कार (एम. एच.04 एच.एम. 1300) नगरहून कल्याणकडे भरधाव वेगाने जात असताना राष्ट्रीय महामार्गावर काळेवाडी (सावरगाव) नजीक मोटारसायकलला (एम.एच. 16 ए.एस.6865) जोराची धडक दिली. या अपघातात मोटारसायकलस्वार मिनीनाथ बांडे याचा जागीच मृत्यू (Death) झाला. याबाबत इर्टिकाचालक अजित भडक वाव्हळ (रा. शहाड, ता. कल्याण, जि. ठाणे) याला ताब्यात (Arrested) घेतले आहे.

अपघात घडल्यानंतर पंचनामा करून मृतदेह टाकळी ढोकेश्वर ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. उशिरा मृतदेह नातोवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. मृत व्यक्ति दिव्यांग असल्याने या दुर्दैवी घटनेने टाकळी ढोकेश्वर सह बांडेमळा परिसरात हळहळ व्यक्त केली.

Web Title: Two-wheeler killed in car-motorcycle Accident

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here