Home संगमनेर संगमनेर तालुक्यात अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

संगमनेर तालुक्यात अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

Two-wheeler killed in Sangamner taluka

संगमनेर | Sangamner: संगमनेर ते कोपरगाव रोडवर संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे शिवारातील समर्थ पेट्रोल पंपासमोरील रस्त्यावर अज्ञात वाहनाने दुचाकीला जोराची धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना सोमवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास घडली.

या अपघातात भरत मधुकर चव्हाण वय ४२ हा व्यक्ती मयत झाला आहे. संगमनेरकडून तळेगाव दिघे गावाच्या दिशेने भरत चव्हाण रा. तळेगाव दिघे हे दुचाकीवरून प्रवास करीत असताना अज्ञात वाहनाने समर्थ पेट्रोल पंपासमोरील रस्त्यावर दुचाकीस धडक दिली. या अपघातात भरत चव्हाण यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर अज्ञात वाहन चालक हा फरार झाला आहे.

याप्रकरणी गणेश पांडुरंग लांडे यांनी पोलिसांत फिर्याद दाखल केली असून त्यानुसार पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालक याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस करीत आहे.

Web Title: Two-wheeler killed in Sangamner taluka

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here