Home अहमदनगर अहमदनगर: धावत्या रेल्वेतून पडून दोन तरुणांचा मृत्यू

अहमदनगर: धावत्या रेल्वेतून पडून दोन तरुणांचा मृत्यू

Ahmednaagr News: धावत्या रेल्वेतून पडल्याने दोन तरुणांचा मृत्यू (Death) झाल्याची घटना.

Two youths Death after falling from a running train

श्रीगोंदा: धावत्या रेल्वेतून पडल्याने दोन तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना श्रीगोंदा तालुक्यातील कारखाना रेल्वे गेटजवळ रविवारी रात्री घडली.

अर्जुनसिंग सरबतसिंग टाक ( वय २९, रा. हडपसर, जि. पुणे) व दिनेश विजय पवार (वय २८, रा. गंजपेठ, जि. पुणे) अशी मयतांची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, गेटमन बाळासाहेब छगन कांडेकर हे रविवारी (दि. १२) रात्री तालुक्यातील श्रीगोंदा कारखाना रेल्वे फाटक येथे कर्तव्य बजावत होते.

रात्री पावणेअकरा वाजण्याच्या सुमारास कांडेकर यांना दोन तरुण रेल्वे रुळाच्या मधोमध पडल्याचे दिसले. रेल्वे गेल्यानंतर त्यांनी जवळ जाऊन पाहिले असता ते दोन्ही तरुण मयत झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. कांडेकर यांनी रेल्वे स्थानक प्रमुखांना ही माहिती दिली. त्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह ताब्यात घेतले. एका मयताच्या खिशात भ्रमणध्वनी सापडल्याने मयतांच्या कुटुंबीयांशी संपर्क झाला. मयतांची ओळख पटली.

शवविच्छेदन करून दोन्ही मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले. या प्रकरणी श्रीगोंदा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Web Title: Two youths Death after falling from a running train

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here