Home जळगाव काकाच्या घरी टीव्ही पहायला गेली ती परतलीच नाही, तीन दिवसांनी थेट मृतदेह...

काकाच्या घरी टीव्ही पहायला गेली ती परतलीच नाही, तीन दिवसांनी थेट मृतदेह आढळला

Jalgaon News: तीन दिवसांनी मुलीचा मृतदेह (Dead body) गुरांच्या गोठ्यात चाऱ्याखाली सापडला.

Uncle's house to watch TV and did not return. The dead body was found three days later

जळगाव:  जळगावातील भडगाव तालुक्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. काकाच्या टीव्ही पहायला गेलेली 8 वर्षाची मुलगी पुन्हा घरी परतलीच नाही. तीन दिवसापासून मुलगी बेपत्ता होती. मुलीचा सर्वत्र शोध घेण्यात येत होता. मात्र मुलगी कुठेच आढळून आली नाही. तीन दिवसांनी मुलीचा मृतदेह गुरांच्या गोठ्यात चाऱ्याखाली सापडला. या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच भडगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला.

याबाबत अधिक माहिती अशी की, पीडित मुलगी रविवारी आपल्या काकाच्या घरी टीव्ही पाहण्यासाठी गेली होती. काकाच्या घरातून दुपारी जेवणासाठी आपल्या घरी येण्यासाठी निघाली. मात्र ती घरी पोहचलीच नाही. बराच वेळ झाला तरी मुलगी घरी न आल्याने आई-वडिलांनी शोध सुरु केला. मात्र मुलीचा कुठेच थांगपत्ता लागत नव्हता. अखेर आई-वडिलांनी सायंकाळी भडगाव पोलीस ठाण्यात मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रा दाखल केली.

पोलीसही मुलीचा शोध घेत होते. अखेर हा शोध थांबला, पण जे समोर आलं ते पाहून आई-वडिलांच्या काळजाचा ठोकाच चुकला. मंगळवारी गोठ्यात कडबा कुट्टीच्या ढिगाऱ्यात मुलीचा मृतदेह आढळून आला. मुलीच्या अशा रहस्यमयरित्या मृत्यूने एकच खळबळ उडाली.  मुलीचा मृत्यू नेमका कसा झाला? हे अद्याप कळू शकले नाही. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर सर्व स्पष्ट होईल. भडगाव पोलीस अधिक तपास करत आहेत.

Web Title: Uncle’s house to watch TV and did not return. The dead body was found three days later

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here