Home अहमदनगर मामाच्या मुलानेच केला अल्पवयीन मुलीवर अत्याचार, गरोदर राहिल्याने उघडकीस

मामाच्या मुलानेच केला अल्पवयीन मुलीवर अत्याचार, गरोदर राहिल्याने उघडकीस

Uncle's son sexual abused a minor girl

Ahmednagar | राहुरी | Rahuri: राहुरी शहरापासून जवळच असलेल्या एका वस्तीवर १५ वर्षीय मुलाने साडे पंधरावर्षीय मुलीवर वारंवार अत्याचार (Sexual abused) केला. त्यानंतर पिडीत मुलगी गरोदर राहिल्याने ही घटना उघडकीस आली आहे. अत्याचार करणारा हा पिडीतेचा मामाचा मुलगा आहे. त्याच्याविरोधात राहुरी पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.

या घटनेतील पिडीत मुलगी तिच्या कुटुंबासह राहते. तिच्या शेजारी तिच्या मामाचे कुटुंब राहते. सन २०२१ मध्ये दिवाळीनंतर चार ते पाच दिवसांनी दुपारच्या सुमारास घरात कोणीही नसल्याचा फायदा घेऊन पिडीतेच्या मामाच्या मुलाने तिला घरात बोलावून घेतले.तिच्या इच्छेविरुद्ध बळजबरीने संभोग केला. घडलेला प्रकार कोणाला सांगितला तर तुला ठार मारीन अशी धमकी दिली. त्यानंतर दोन तीन दिवसांनी पुन्हा त्याने अत्याचार केला.

काही दिवसांपूर्वी पिडीत मुलीच्या पोटात दुखू लागल्याने तिला नगर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेथे तपासणी केली असता सहा महिन्याची गरोदर असल्याचे सांगितले. त्यानंतर घडलेला प्रकार आई वडिलांना सांगितला. त्यानंतर मुलीसह आई वडिलानी पोलीस ठाणे गाठत तक्रार दाखल केली. राहुरी पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

Web Title: Uncle’s son sexual abused a minor girl

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here