Home संगमनेर संगमनेर तालुक्यातील विद्यमान सरपंच यांचे विजेच्या धक्क्याने दुर्दैवी निधन

संगमनेर तालुक्यातील विद्यमान सरपंच यांचे विजेच्या धक्क्याने दुर्दैवी निधन

Sangamner : पिंपळगाव देपा गावचे विद्यमान सरपंच प्रदिप गुंड यांचे घरात विजेचा धक्का (electric shock) लागून दुर्दैवी निधन, निधनाने परिसरात शोककळा.

Unfortunate death of current sarpanch due to electric shock 

संगमनेर: तालुक्यातील पिंपळगाव देपा (Pimpalgaon Depa) गावचे विद्यमान सरपंच प्रदिप गुंड यांचे आज गुरूवारी सकाळी सातच्या सुमारास घरात विजेचा धक्का लागून दुर्दैवी निधन झाले. मृत्यू समयी ते अवघे ३० वर्षाचे होते. त्यांच्या निधनाने संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

याबबात माहिती अशी की, सरपंच प्रदिप गुंड हे नेहमीप्रमाणे सकाळी आपले कामकाज करत असतांना अचानक त्यांना घरातील वीजेच्या उपकरणाचा जोराचा धक्का बसला  यावेळी वीजप्रवाह जास्त असल्याने त्यांना धक्का बसला. त्यांना उपचारासाठी नेले असता डॉक्टरांनी मृत घोषीत केले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी, एक मुलगा असा परिवार आहे. सरपंच म्हणून त्यांना गावात मोठे काम उभारले असून त्यांचा दांडगा जनसंपर्क होता. त्यांच्या निधनाने परिसरात शोककळा पसरली आहे.

Web Title: Unfortunate death of current sarpanch due to electric shock

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here