Home अहमदनगर अहमदनगर: अवकाळी पाऊस, वीज पडून महिलेसह दोघांचा मृत्यू, कांदे झाकायला गेले अन...

अहमदनगर: अवकाळी पाऊस, वीज पडून महिलेसह दोघांचा मृत्यू, कांदे झाकायला गेले अन घात झाला  

Ahmednagar News: वादळात भेर्डापूर येथे शेतातून मोटारसायकलवर घरी जाणार्‍या शेतकरी व महिला मजुराच्या अंगावर वीज पडून  (lightning strike) महिलेसह दोघांचा मृत्यू झाला.

Unseasonal rain, two dead including a woman due to a lightning strike

 

श्रीरामपूर| Shrirampur: अवकाळी पावसाने शेतमालाचे नुकसान केलेले आहेतच त्यात आता जीवितहानी देखील झाली आहे.  श्रीरामपूर तालुक्यात काल बुधवारी झालेल्या वादळात भेर्डापूर येथे शेतातून मोटारसायकलवर घरी जाणार्‍या शेतकरी व महिला मजुराच्या अंगावर वीज पडून महिलेसह दोघांचा मृत्यू (Death) झाला तर एक महिला घाबरून बेशुद्ध पडली. या घटनेने गावावर शोककळा पसरली आहे.

प्रमोद भाऊसाहेब दांगट (वय 47), श्रीमती अलका रामदास राऊत (वय 50) अशी या घटनेत मृत्यू झालेल्यांची नावे असून श्रीमती संगीता रवींद्र साळे (वय 42) ही महिला जखमी झाली आहे. या वादळात अंदाजे 8 ते 10 घरांचे नुकसान झालेले आहे.

काल सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास सोसाट्याच्या वार्‍यासह वादळ झाले. यावेळी दांगट शेतातील कांदे झाकून घरी जात असताना अलका राऊत यांनी त्यांना मोटारसायकलवरून घरी नेण्याची विनंती केली. त्यानंतर ते दोघे मोटारसायकलवरून जात असताना चारी नं. 11 जवळ त्यांच्या अंगावर वीज पडली. त्यात दांगट आणि अलका राऊत यांचा जागीच मृत्यू झाला. यावेळी ही घटना पाहून संगीता साळे या बेशुद्ध झाल्या.

या घटनेनंतर सरपंच प्रताप कवडे यांनी घटनास्थळी भेट दिली. परिसरातील नागरिकांनी मृतांना ट्रॅक्टर मधून दवाखान्यात आणले. त्यानंतर श्रीरामपूर येथील साखर कामगार रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले शवविच्छेदनानंतर रात्री 11 वा दोघांवर भेर्डापूर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेने गावात शोककळा पसरली आहे.

Web Title: Unseasonal rain, two dead including a woman due to a lightning strike

Sangamner Akole News Whats app Marketing

See Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here