Home संगमनेर संगमनेर घटना: अल्पवयीन मुलांचा वेठबिगारीसाठी वापर, दोघांवर गुन्हा

संगमनेर घटना: अल्पवयीन मुलांचा वेठबिगारीसाठी वापर, दोघांवर गुन्हा

Sangamner Crime:  शेळ्या मेंढ्या सांभाळण्याचे जबरदस्तीने काम करून घेऊन त्यांची शारीरिक व मानसिक छळवणूक केल्याची घटना.

Use of minors for prostitution, Crime Filed

संगमनेर: कातकरी व भिल्ल समाजाच्या अल्पवयीन मुलांच्या अज्ञानपणाचा व गरिबीचा फायदा घेऊन वेठबिगार म्हणून त्यांच्याकडून शेळ्या मेंढ्या सांभाळण्याचे जबरदस्तीने काम करून घेऊन त्यांची शारीरिक व मानसिक छळवणूक केल्याची घटना तालुक्यातील डिग्रस येथे घडली असून याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे.

डिग्रस येथील अहिलाजी भिकाजी पुणेकर व किशोर लक्ष्मण वावरे यांनी शेळ्या मेंढ्या सांभाळण्यासाठी अल्पवयीन मुलांना आपल्या गावी आणले होते. त्यांनी त्यांच्याकडे कामास असलेले कातकरी व भिल्ल समाजाची मुले यांच्या गरिबीचा फायदा घेऊन त्यांचेकडून वेठबिगार म्हणून शेळ्या मेंढ्या सांभाळण्याचे जबरदस्तीने काम करून घेतले. चार महिन्यापूर्वी हा प्रकार घडला होता.

Business Idea | पाच हजार रुपयांच्या गुंतवणुकीत कमवा बक्कळ पैसा | Earn Money from Business

याबाबत गोकुळ देवराम हेलम यांनी तालुका पोलीस ठाण्यात काल फिर्याद दिली या फिर्यादीवरून पोलिसांनी अहिलाजी भिकाजी पुणेकर व किशोर लक्ष्मण वावरे दोघे राहणार डिग्रस तालुका संगमनेर यांच्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 50/2023 भा.दं.वि कलम 374, बंधबिगार अधिनियम 1976 चे कलम 16,17,18 सह अनुसूचित जाती अधिनियम 1989 चे सुधारित 2015 चे कलम 3(1 ) एच व बालकामगार ( प्रतिबंध आणि विनियमन ) अधिनियम 1986 चे कलम 3,14 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सातव हे करीत आहे.

Web Title: Use of minors for prostitution, Crime Filed

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here