Home क्राईम संगमनेर: गावकरी येताच चोरटे पिकअप सोडून पसार

संगमनेर: गावकरी येताच चोरटे पिकअप सोडून पसार

Sangamner News: शेतकर्‍याच्या शेतातील ठिबक संचाचे पाईप चोरुन (thieves) पिकअपमधून अज्ञात चोरटे घेऊन जात होते. हा प्रकार गावकऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी त्यांचा पाठलाग केला असता चोरटे साहित्यासह पिकअप सोडून पसार झाल्याची घटना.

Villagers arrive, the thieves leave the pickup and run away

संगमनेर: संगमनेर तालुक्यातील नांदुरी दुमाला या गावात चोरटे पिक सोडून पसार झाल्याची घटना घडली आहे. सोमवारी मध्यरात्री हा प्रकार घडला आहे. मध्यरात्री एक वाजेनंतर एका शेतकर्‍याच्या शेतातील ठिबक संचाचे पाईप चोरुन  पिकअपमधून अज्ञात चोरटे घेऊन जात होते. हा प्रकार गावकऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी त्यांचा पाठलाग केला असता चोरटे साहित्यासह पिकअप सोडून पळून गेले.

नांदुरी दुमाला येथील शेतकरी मुरलीधर महादू साबळे यांच्या घरासमोरील शेतात ठिबक संचाचे साहित्य होते. सोमवारी मध्यरात्री एक वाजेनंतर सदर साहित्य अज्ञात चोरट्यांनी चोरुन पिकअप (क्र.एमएच. 17 बीवाय 7044) मध्ये भरले. त्यानंतर ते घेऊन जात असताना हा प्रकार काही गावकर्‍यांच्या लक्षात आला. त्यानंतर गावकर्‍यांनी पिकअपचा पाठलाग सुरू केला.

शेवटी चोरट्यांनी साहित्यासह पिकअप सोडून थेट पळ काढला. याबाबत शेतकरी मुरलीधर साबळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन तालुका पोलिसांनी अज्ञात तीन ते चार चोरट्यांविरुद्ध दाखल केला आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस नाईक उगले हे करत आहे.

Web Title: Villagers arrive, the thieves leave the pickup and run away

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here