Home महाराष्ट्र Omicron: ब्रिटनमध्ये करोनाचा हाहाकार; हा आकडा पाहून धडकी भरेल

Omicron: ब्रिटनमध्ये करोनाचा हाहाकार; हा आकडा पाहून धडकी भरेल

wailing of the omicron corona in Britain

नवी दिल्ली | Omicron: ओमिक्रॉन व्हेरिएंटने शिरकाव केल्यानंतर ब्रिटनमध्ये धडकी भरली आहे. गेल्या २४ तासांत तब्बल १ लाख ६ हजार १२२ नवे करोना बाधित आढळल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे. ब्रिटनमध्ये कोविडची साथ आल्यापासूनची ही सर्वोच्च रुग्णसंख्या ठरली असून दैनंदिन रुग्णसंख्येने प्रथमच लाखाचा आकडा पार केला आहे.

ब्रिटनमध्ये गेल्या काही दिवसांपासून करोना रुग्णसंख्येचा उद्रेक पाहायला मिळत असल्याने भीषण स्थिती निर्माण झाली आहे. ओमिक्रॉन व्हेरिएंटने शिरकाव केल्यानंतर काही दिवसांतच रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली आहे. आज तर कहरच झाला असून रुग्णसंख्येने लाखाचा टप्पा पार केला आहे. गेल्या २४ तासांतील आकडेवारी हाती आली असून त्यात करोनाचे १ लाख ६ हजार १२२ नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यात एकाच दिवशी ओमिक्रॉनचे १२ हजार १३३ रुग्ण आढळल्याने चिंता वाढली आहे. ओमिक्रॉन व्हेरिएंटची लागण होऊन ब्रिटनमध्ये आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील ओमिक्रॉन बाधितांची एकूण संख्या ३७ हजार १०१ इतकी झाली आहे.

ब्रिटनमध्ये शुक्रवारी ९३ हजार ४५ तर शनिवारी ९० हजार ४१८ रुग्ण आढळले होते. त्यानंतर रुग्णसंख्येने थेट लाखाचा टप्पा ओलांडल्याने सरकारी पातळीवर वेगवान पावले टाकण्यात येत आहेत. नागरिकांनी बूस्टर डोस घ्यावा, असे आवाहन सरकारने केले आहे. ब्रिटनच्या कॅबिनेटमध्ये कोविड स्थितीवर चर्चा करण्यात आली. कडक लॉकडाऊन लावले जावे का, यावरही विचार करण्यात येत आहे.

एकीकडे ब्रिटनसह यूरोपमधील अनेक देशांत करोनाने थैमान घातले असताना भारत सतर्क झाला आहे. भारतात ओमिक्रॉन बाधितांची संख्या वाढत आहे. देशातील रुग्णसंख्या २२९ वर पोहचली आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून पुन्हा कठोर निर्बंध लावेल जातील असे संकेत मिळत आहेत.

Web Title: wailing of the omicron corona in Britain

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here