Home अकोले भंडारदरा निळवंडे धरणातून 3 मे पासून पिण्याचे पाण्याचे आवर्तन सुरु होणार

भंडारदरा निळवंडे धरणातून 3 मे पासून पिण्याचे पाण्याचे आवर्तन सुरु होणार

भंडारदरा:  आजमितीस भंडारदरा धरणात 1602 दलघफू तर निळवंडे धरणात 1142  दलघफू पाणीसाठा शिल्लक आहे. दोन्ही धरण मिळून आज 2744 दलघफू पाणी साठा शिल्लक आहे.  मृत साठा तसेच बाष्पीभवन वजा करून फक्त 2000 दलघफू पाणी पिण्याचे आवर्तनासाठी शिल्लक आहे. वरील सर्व साठा आता जिल्हाधिकारी यांच्या ताब्यात आहे. मा. जिल्हाधिकारी यांचे सोबत कार्यकारी अभियंता यांनी चर्चा करून पिण्याच्या आवर्तनासाठी परवानगी घेण्यात आली.  त्यानुसार दोन्ही धरणात  शिल्लक असलेल्या 2000 दलघफू पाण्यामधे पिण्याचे तिन आवर्तने करण्यात येतील. 

त्यातील पहिले आवर्तन 3 मे पासून सुरु करण्यात येईल. पिण्याचे प्रत्येक आवर्तन हे अंदाजे 700 दलघफू चे असेल. 1600 क्यूसेक विसर्ग असेल. साधारण 5 ते 6 दिवसांचे हे आवर्तन असतील. तिन्ही आवर्तने हे श्रीरामपूर पर्यंत असतील. 

आवर्तन काळात 20 तास विद्यूत प्रवाह बंद करण्यात येईल. 

दुसरे आवर्तन मे च्या शेवटच्या आठवड्यात किंवा 1 जून च्या दरम्यान घेण्यात येईल. 

तिसरे व या वर्षातील शेवटचे आवर्तन 25 जून च्या दरम्यान घेण्यात येईल. पिण्याच्या पाण्याची परिस्थिती पाहून पुढिल दोन्ही आवर्तनाच्या वेळेत बदल करण्याचे अधिकार जिल्हाधिकारी यांनी कार्यकारी अभियंता यांना दिले आहेत.

आवर्तन काळात जलसंपदा  महसूल आणि पोलीस, खाते एकत्रितपणे काम करून नियोजित आवर्तने पूर्ण करतील. 

या पूर्वी दोन्ही धरणातून खरीपाचे एक, रब्बीचे दोन, जायकवाडी साठी एक त्यालाच जोडून प्रवरा नदीवरील को. प. बंधार्यांसाठी एक, ऊण्हाळ्यातील पिण्यासाठी एक  आणि ऊण्हाळ्यातील शेतीसाठी एक अशी  आवर्तने करण्यात आली आहेत. 

सगळीकडे दुष्काळी परिस्थिती असल्याने सर्वांनी काटकसरीने पाणी वापर करून पाण्याची बचत करावी. 

तरी सर्वांना नम्र आवाहन करण्यात येते की जलसंपदा विभागाला सहकार्य करावे. 

किरण देशमुख. 

कार्यकारी अभियंता.

अहमदनगर पाटबंधारे विभाग. 

अहमदनगर .

Website Title: water cycle of drinking water from the Nilwande dam

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here