Home औरंगाबाद जायकवाडी धरणाचा पाणीसाठा इतक्या टक्क्यांवर, पहा आजची आकडेवारी

जायकवाडी धरणाचा पाणीसाठा इतक्या टक्क्यांवर, पहा आजची आकडेवारी

Jayakwadi Dam: जायकवाडी धरणात आजघडीला 45.18 टक्के पाणीसाठा असून, 7 हजार 749 क्युसेकने पाण्याची आवक सुरु.

water storage of Jayakwadi Dam is at this percentage

छत्रपती संभाजीनगर: सप्टेंबर महिन्यात अखेरीस पावसाने जोरदार हजेरी लावल्याने काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. त्यामुळे अनेक छोट्या-मोठ्या प्रकल्पातील पाणीसाठा देखील वाढला आहे. अशातच मराठवाड्याची तहान भागवणाऱ्या जायकवाडी धरणात  सुद्धा पाण्याची आवक सुरु असून, पाणीपातळी वाढतांना दिसत आहे. नाशिक जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसामुळे वरील धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे जायकवाडी धरणात पाण्याची आवक सुरु आहे. जायकवाडी धरणात आजघडीला 45.18 टक्के पाणीसाठा असून, 7 हजार 749 क्युसेकने पाण्याची आवक सुरु आहे.  23 सप्टेंबरला 19 हजार क्युसेकने सुरु असलेली पाण्याची आवक आता घटून, 7 हजारांवर आली आहे.

मागील तीन-चार वर्षांपासून मराठवाड्यात अतिवृष्टी होतांना पाहायला मिळत आहे. त्यामुळे जायकवाडी धरण देखील तीन वर्षांपासून पूर्णपणे भरल्याचे चित्र पाहायला मिळाले. मात्र, यंदा परिस्थिती वेगळी आहे. कारण सुरुवातीलाच मान्सून उशिरा दाखल झाला. त्यात जून महिना कोरडा गेला. जुलैत काही प्रमाणात पाऊस झाला आणि पुन्हा ऑगस्ट देखील कोरडाच गेला. त्यात सप्टेंबर महिन्यात 20 तारखेनंतर जोरदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे आता काही प्रमाणात दिलासा मिळाला असून, जायकवाडीत देखील आवक सुरु झाली आहे. सध्या पाण्याची आवक कमी झाली आहे. यंदा जायकवाडी धरण ५० टक्केवारी पर्यंत देखील अजून पोहचू शकले नाही. गेल्यावर्षी आजच्या तारखेत जायकवाडी धरणात 99.45 टक्के पाणीसाठा होता.

Web Title: water storage of Jayakwadi Dam is at this percentage

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here