Home महाराष्ट्र आमच्याकडे सुद्धा जोडे आहेत, बाळासाहेब थोरातांचा सत्ताधाऱ्यांना इशारा

आमच्याकडे सुद्धा जोडे आहेत, बाळासाहेब थोरातांचा सत्ताधाऱ्यांना इशारा

जे घडलं ते अत्यंत चुकीचं आहे, राहुल गांधी हे आमचे राष्ट्रीय नेते आहेत, सत्ताधाऱ्यांनी आमच्याकडे सुद्धा पायथान आहेत हे लक्षात ठेवा, असा कडकडीत इशारा कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी दिला.

We also have pairs, Balasaheb Thorat's warning to the rulers

Balasaheb Thorat: राहुल गांधी प्रकरणावरुन सध्या देशाचे राजकारण चांगलेच तापले आहे. दोन दिवसांपूर्वी विधिमंडळाच्या आवारात कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या प्रतिमेला सत्ताधारी आमदारांकडून जोडे मारण्यात आले होते. ज्यावर विरोधी पक्षांनी आक्षेप घेत जोरदार विरोध दर्शवला होता. या घटनेवर कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनीही सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

राहुल गांधी यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलनावर विरोधी पक्षातील सर्वच नेत्यांनी कडाडून निषेध व्यक्त केला आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही या घटनेचा निषेध केला. तर कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी याबद्दल बोलताना जे घडलं ते अत्यंत चुकीचं आहे, राहुल गांधी हे आमचे राष्ट्रीय नेते आहेत, सत्ताधाऱ्यांनी आमच्याकडे सुद्धा पायथान आहेत हे लक्षात ठेवा, असा कडकडीत इशारा त्यांनी दिला आहे.

तसेच याबद्दल पुढे बोलताना, “आपल्या सभागृहात आणि प्रांगणात चुकीचं घडतंय असं होत असेल तर त्याला अध्यक्ष जबाबदार असतात असे म्हणत अशाप्रकारची घटना भविष्यातही एखाद्या नेत्यासोबत घडेल, हे प्रकार टाळण्यासाठी ठोस निर्णय घेणे गरजेचे होते, मात्र अध्यक्ष टाळाटाळ करत असल्याचा,” आरोपही त्यांनी यावेळी केला. संबंधितांना लवकरात लवकर निलंबित करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली.

दरम्यान, सुरत जिल्हा सत्र न्यायालयाने कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांना दोन वर्षाची शिक्षा दिल्यानंतर त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. या निर्णयानंतर देशभरातील विरोधी पक्षांनी भाजपविरोधात आक्रमक भूमिका घेत निषेध नोंदवला आहे.

Web Title: We also have pairs, Balasaheb Thorat’s warning to the rulers

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here