अहमदनगरसह राज्यात अवकाळी पावसासह तुफान गारपीटीची शक्यता
Weather Updates हवामान खात्याचा अंदाज ५ ते ६ मार्च पर्यंत अवकाळी पावसाची (Rain Alert) शक्यता.
अहमदनगर: गेल्या काही दिवसांपासून राज्यातील वातावरणात सातत्याने बदल होत आहेत. दिवसा उन्हाचा तडाखा तर रात्री थंडीची हुडहुडी जाणवत आहे. त्यातच आता हवामान खात्याने राज्यात अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या रब्बी हंगामातील पिकांवर संकट ओढावलं आहे. दुसरीकडे गाटपीट होण्याची शक्यता असल्याने द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
देशाच्या वायव्य दिशेकडून बंगालच्या उपसागरात सागराहून वारे वाहत आहेत. तसेच अरबी समुद्रातून नैऋत्येकडून वायव्य भारताच्या दिशेने सरकणारे पण उत्तर महाराष्ट्राकडे वळणाऱ्या आर्द्रतायुक्त वाऱ्यांचा मिलाफ होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच हवामान खात्याने आजपासून ६ मार्चपर्यंत राज्यातील काही भागात अवकाळी पावसासह तुफान गारपीटीचा इशारा दिला आहे.
कोठे पडणार पाऊस:
हवामान खात्याने जारी केलेल्या अंदाजानुसार, प्रत्यक्षात सोमवार दिनांक ६ मार्च संध्याकाळपासून ते बुधवार दिनांक 8 मार्चपर्यंत नाशिक जिल्ह्यातील सिन्नर, नाशिक, येवला, नांदगाव, दिंडोरी, कळवण, सटाणा, मालेगाव, देवळा तसेच खान्देश, अहमदनगर, पुणे, सातारा, औरंगाबाद, जालना, बुलढाणा, हिंगोली आणि वाशिम या जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
दरम्यान, पावसाबरोबरच गारपीट देखील होऊ शकते, अशी शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तवली आहे. पाऊसाचा जोर कमी असला तरी, गारपीट होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असं हवामान तज्ज्ञांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर वाऱ्याचा वेगही कदाचित जास्त असू शकतो.
Web Title: Weather Updates Chance of thunderstorm with unseasonal rain in the state including Ahmednagar
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App