Home अकोले अकोले ब्रेकिंग: अमृतसागर दुध संघात वैभवरावांनी गड राखला

अकोले ब्रेकिंग: अमृतसागर दुध संघात वैभवरावांनी गड राखला

Akole Amrutsagar Election result Update: अमृतसागर दुध संघात वैभवराव पिचड यांनी गड राखला.

Akole Amrutsagar Election result Update

अकोले: अकोले तालुक्यातील अमृतसागर दुध संघात वैभवराव पिचड यांनी गड राखला आहे. आज मतदान पार पडले १५ जागांसाठी उमेदवार रिंगणात उभे होते. आजच मतदान आणि निकाल जाहीर करण्यात आला आहे.

अकोले तालुक्यातील अमृतसागर दुध संघात माजी आमदार वैभव पिचड यांच्या पॅनलचे १३ उमेदवार बहुमताने विजयी झाले आहे तर आमदार डॉ. किरण लहामटे यांच्या पॅनलचे २  उमेदवार निवडून आले आहेत.

अकोले तालुक्यातील महत्वाची सहकारी संस्था असणार्‍या अमृतसागर सहकारी दूध व्यावसायिक व प्रक्रिया संघाच्या निवडणूकीत माजी मंत्री मधुकरराव पिचड व माजी आमदार वैभवराव पिचड यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी विकास मंडळाने एकतर्फी विजय संपादन केला. या निवडणुकीत महाविकास आघाडी व मित्र पक्षांच्या शेतकरी समृद्धी मंडळाचा दणदणीत पराभव केला. या मंडळाला अवघ्या दोन जागांवर समाधान मानावे लागले. तर शेतकरी विकास मंडळाने 13 जागांवर नेत्रदीपक यश संपादन केले आहे.

अमृतसागर दूध संघाच्या संचालक मंडळाच्या 15 जागांसाठी आज रविवारी शांततेत 100 टक्के मतदान पार पडले. या निवडणुकीत माजी मंत्री मधुकरराव पिचड व माजी आमदार वैभवराव पिचड यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी विकास मंडळ व आ डॉ किरण लहामटे, अगस्ति कारखान्याचे अध्यक्ष सीताराम गायकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अशोकराव भांगरे यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी समृद्धी मंडळात सरळ लढत झाली.

सर्वसाधारण मतदार संघ- आप्पासाहेब आवारी 80, रामदास आंबरे 66, अरुण गायकर 64, बबन चौधरी 69, सुभाष डोंगरे 73, जगन देशमुख 66, गंगाधर नाईकवाडी 65, रावसाहेब वाकचौरे 76

महिला राखीव – सुलोचना भाऊसाहेब औटी 75, अश्विनी प्रविण धुमाळ 79,

इतर मागासवर्ग –आनंदराव वाकचौरे 81

भटक्या विमुक्त जाती जमाती – बाबूराव बेनके 75,

विरोधी शेतकरी समृद्धी मंडळाचे सर्वसाधारण गटातुन-

गोरक्ष मालुंजकर 71 व शरद चौधरी 66 हे दोन जण विजयी झाले. प्रमुख पराभूत उमेदवारांमध्ये दूध संघाचे माजी अध्यक्ष प्रतापराव देशमुख, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दादा पाटील वाकचौरे, माजी संचालक सोपान मांडे, सुभाष बेनके, अगस्ति कारखान्याचे माजी उपाध्यक्ष गुलाबराव शेवाळे, उद्योजक सुरेश गडाख, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उप जिल्हाप्रमुख रामहरी तिकांडे आदी उमेदवारांचा समावेश आहे.

निकाल घोषित होताच भाजप कार्यकर्ते व माजी आमदार वैभवराव पिचड यांच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला. निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक सरकारी संस्था (दुग्ध) दीपक पराये यांनी काम पाहिले.

त्यांना सहाय्यक निबंधक सर्जेराव कांदळकर व दुध संघाचे कार्यकारी संचालक दादाभाऊ सावंत यांनी मदत केली.

Web Title: Akole Amrutsagar Election result Update

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here