Home अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यातून मंत्रिमंडळात कोणाला मिळणार संधी?

अहमदनगर जिल्ह्यातून मंत्रिमंडळात कोणाला मिळणार संधी?

Who will get a chance in the cabinet from Ahmednagar 

Ahmednagar | अहमदनगर: राज्यात भाजप व शिंदे गटाचे सरकार स्थापन झाले आहे. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. सरकार स्थापन झाल्याने नगर जिल्ह्यात मंत्रिमंडळात कोणाला संधी मिळणार याबाबत चर्चा रंगू लागली आहे. भाजपचे आ. राम शिंदे, आ. राधाकृष्ण विखे पाटील, आ. मोनिका राजळे याचे नाव चर्चेत असल्याचे समजते. मात्र धक्कातंत्राचा अवलंब करीत असल्याने आता नेते आणि समर्थकही बोलण्यास तयार नाही. सध्या सर्वोच्च न्यायालायात सुनावणी होणार आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. त्ग्यामुळे नगर जिल्ह्यात कोणाला लॉटरी लागणार याकडे सर्वांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.

नव्या सरकारमधील मुख्यमंत्री शिंदे गटाचा गटाचा नेता जिल्ह्यात नाही. त्यामुळे जिल्ह्यातून भाजपच्या नेत्यांमध्ये स्पर्धा असेल.

माजी मंत्री आ.राम शिंदे आणि आ.राधाकृष्ण विखे पाटील या पक्षातील अनुभवी नेत्यांची नावे मंत्रीपदासाठी आघाडीवर आहेत. मात्र, जिल्ह्यात भाजपमध्ये सुप्त मतभेद आहेत. शिंदे आणि विखे गट अशी विभागणी दिसून आली आहे. शिंदे गटात पक्षातील माजी आमदारांची मोठी फळी आहे. या नेत्यांना विखे यांना विरोध राहिला आहे. त्यामुळे शिंदे आणि विखे अशा दोन्ही नेत्यांना संधी देवून पक्ष समतोल साधणार की भाजप सरकारच्या पहिल्या कार्यकाळाप्रमाणे एकालाच संधी मिळेल, याकडे अनेकांचे लक्ष आहे.

Web Title: Who will get a chance in the cabinet from Ahmednagar 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here