Home औरंगाबाद चार महिन्यांपूर्वी बायको सोडून गेली; २५ वर्षांच्या तरुणाने घेतला टोकाचा निर्णय

चार महिन्यांपूर्वी बायको सोडून गेली; २५ वर्षांच्या तरुणाने घेतला टोकाचा निर्णय

२५ वर्षीय तरुणाने राहत्या घरातील छताच्या लोखंडी अँगलला दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची घटना.

Wife left four months ago; The 25-year-old took Suicide Decision

छत्रपती संभाजीनगर: करमाड परिसरातील गोलटगाव येथील २५ वर्षीय तरुणाने राहत्या घरातील छताच्या लोखंडी अँगलला दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवार दि. २३ रोजी पहाटे पाच वाजता उघडकीस आली.

याप्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, अनिल संजय गुंजाळ वय २५ रा. वडर वाडी गोलटगाव ता. जि. छत्रपती संभाजीनगर असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. अनिल हा कुटुंबीयांसोबत बोलते गाव परिसरामध्ये राहत होता त्याचा विवाह झालेला असून त्याला एक मुलगा आणि मुलगी आहे. पूर्वी तो मजुरी काम करायचा मात्र गेल्या काही दिवसांपासून अनिल हा दारूच्या आहारी गेला होता.

अनिल सतत दारू पिऊन पत्नीलाही त्रास देत असायचा. त्यामुळं त्याच्या रोजच्या त्रासाला वैतागून चार महिन्यांपासून पत्नी मुलांसह माहेरी निघून गेली होती. दरम्यान शनिवार दिनांक २२ रोजी दिवसभर बाहेर फिरून रात्री घरी झोपण्यासाठी आला. पहाटे पाच वाजेच्या सुमारास अनिलने घराच्या पत्र्याच्या खोलीत लोखंडी अँगलच्या दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.

ही बाब घरच्यांच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ त्याला घाटी रुग्णालयात दाखल केलं. मात्र डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केलं. दरम्यान अनिल याने आत्महत्या का केली यामागील कारण अद्याप समजू शकले नाही. याप्रकरणी करमाड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास पो.हे. विक्की जाधव करीत आहे.

Web Title: Wife left four months ago; The 25-year-old took Suicide Decision

See Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here