Home अहमदनगर अहमदनगर: ब्युटी पार्लर मध्ये महिलेवर अत्याचार, अश्लील फोटो काढून धमकी

अहमदनगर: ब्युटी पार्लर मध्ये महिलेवर अत्याचार, अश्लील फोटो काढून धमकी

Breaking News | Ahmednagar: ब्युटी पार्लर मध्ये छुपे कॅमेरे बसून नग्न अवस्थेत फोटो काढून ते मोबाईलवर प्रसारित करण्याची धमकी देत फिर्यादीच्या पार्लर मध्ये शारीरिक संबंध.

Woman abused in beauty parlour

कोपरगाव:  ब्युटी पार्लर मध्ये छुपे कॅमेरे बसून नग्न अवस्थेत फोटो काढून ते मोबाईलवर प्रसारित करण्याची धमकी देत फिर्यादीच्या पार्लर मध्ये शारीरिक संबंध ठेवले त्याच बरोबर वेळोवेळी आरोपी याने फिर्यादीसोबत मनाविरुद्ध शारीरिक संबंध ठेऊन व जीवे मारण्याची धमकी देत अत्याचार केल्याप्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात फिर्यादी महिलेने कोपरगाव तालुक्यातील आरोपी टाकळी येथील सुनील अर्जुन देवकर याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केल्याने शहरासह तालुक्यात खळबळ उडाली आहे.

बऱ्याच वापरकर्त्यांना त्यांच्या काही ऑनलाइन क्रियाकलापांचा प्रभाव किंवा संभाव्य परिणाम माहित नसतात किंवा समजत नाहीत. त्यांना सर्वसाधारणपणे नैतिक आणि अनैतिक वर्तन शिकवणे आणि मुलां महिलांच्या हक्कांबद्दल जागरूकता त्यांच्या संप्रेषणाच्या पीडितांबद्दल सहानुभूती निर्माण करू शकते आणि सायबर धमकी, अपमानास्पद टिप्पण्या यासारख्या काही समस्या सोडवू शकतात. तथापि, त्यांना त्यांच्या काही ऑनलाइन क्रियांच्या कायदेशीर परिणामांबद्दल देखील जागरूक करणे आवश्यक आहे. बऱ्याचवेळा याच्या अभावाने अनेक गुन्हे घडताना दिसत आहे. अशीच घटना नुकतीच कोपरगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून त्याबाबत कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात आरोपी सुनील देवकर याचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

त्याबाबत सविस्तर वृत्त असे की, “दि. २२ ऑगस्ट २०२२ रोजी फिर्यादी महिलेला पार्लर व्यवसायासाठी आरोपी सुनील देवकर याने रुपये ५ लाख रुपये उसनवार दिले होते. त्या मोबदल्यात त्याने महिलेचा विश्वास संपादन केला होता. व फिर्यादी महिलेच्या नकळत आरोपी याने पार्लरमध्ये छुपे कॅमेरे बसून फिर्यादी हिचे नग्न अवस्थेत फोटो काढून सदर फोटो हे व्हायरल करण्याची धमकी देत दिली होती. त्याचा गैरवापर करत फिर्यादी सोबत वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवले होते. फिर्यादी हिच्या २०२२ रोजी पार्लर मध्ये त्याच बरोबर आरोपी याच्या धारणगाव रोड येथील ऑफिस वर आणि नाशिक येथील एका लॉज वर बळजबरीने फिर्यादी हिची इच्छा नसताना शारीरिक संबंध ठेऊन धमकावले असल्याचे आपल्या फिर्यादीत म्हटले आहे. वारवांरच्या त्रासाला कंटाळून तिने अखेर कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याच्या निर्णय घेतला होता.

दरम्यान कोपरगाव शहर पोलिसांनी या प्रकरणी आरोपी विरुद्ध भा. द. वि. कलम ३७६ (२) (एन), ५०६ प्रमाणे शनिवार दि.२० एप्रिल रोजी सायंकाळी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात येथे सदर गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Woman abused in beauty parlour

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here