Home संगमनेर संगमनेर: महिला डॉक्टरचे नियंत्रण सुटल्याने कार उलटली

संगमनेर: महिला डॉक्टरचे नियंत्रण सुटल्याने कार उलटली

Breaking News | Sangamner: महिला डॉक्टर चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने अपघात झाल्याची घटना.

woman doctor lost control and the car overturned

घारगाव : महिला डॉक्टर चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने अपघात झाल्याची घटना घडली. संगमनेर तालुक्यातील पठार भागातील बोटा गावांतर्गत तळपेवाडी परिसरात पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर बुधवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास हा अपघात झाला.

सुदैवाने केवळ दैव बलवत्तर म्हणून अपघातात चालक महिला डॉक्टरसह आई व लहान मुलगी बालंबाल बचावले, मात्र कारचे मोठे नुकसान झाले आहे. डॉ. प्रीती गवांदे (३५) व आई ताराबाई धुमाळ ( ६०), मुलगी इच्छा गवांदे (१०) हे मारुती सुझुकी कंपनीची अल्टो ८०० कार (क्रमांक एम एच १४ फ एस ९३७३) मधून पुण्याहून सकाळी ६ वा. संगमनेरकडे निघाल्या होत्या. मुलगी इच्छा हिला शाळेला सुट्टी असल्याने मामाच्या गावी सोडण्यासाठी आई व आजी संगमनेर- पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करीत होत्या. बोटा गावाच्या पुढे आल्यानंतर अचानक चालक डॉ. प्रीती गवांदे यांचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार थेट महामार्ग सोडून रस्त्यावरुन जम्प घेत २०० फुटांवर पलटी झाली. नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत तिघींना सुखरूप कारमधून बाहेर काढून धीर दिला.

Web Title: woman doctor lost control and the car overturned

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here