Home क्राईम भोंदुबाबाचा प्रताप: अंगात दैवी शक्ती असल्याचे भासवून महिलेवर तीन वर्ष अत्याचार

भोंदुबाबाचा प्रताप: अंगात दैवी शक्ती असल्याचे भासवून महिलेवर तीन वर्ष अत्याचार

Crime news: भोंदूबाबाने एप्रिल 2018 पासून ऑक्टोबर 2022 पर्यंत पीडितेवर अत्याचार(abused), पाच लाख रूपये उकळले.

a woman was abused for three years by pretending to have divine power in her body

नाशिक:  शहरातील आश्रमातील मुलींवर अत्याचार केल्याची घटना ताजी असतानाच आता भोंदुबाबाचा प्रताप समोर आला आहे. नाशिकरोड परिसरातील एका भोंदूबाबाने अंगात दैवी शक्ती असल्याचे भासवून महिलेवर तीन वर्ष अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. अत्याचाराच्या घटनेने नाशिक शहरात खळबळ माजली आहे.

नाशिकरोड परिसरात राहणाऱ्या भोंदू बाबाने महिलेवर अत्याचार केल्याचा प्रकार समोर आलं आहे. विष्णु काशिनाथ वारूंगसे उर्फ देवबाबा असे या संशयित भोंदूबाबाचे नाव असून त्यासोबत सुनिता विष्णू वारूगसे, उमेश विष्णू वारूंगसे, वैशाली विष्णू वारूगसे अशी इतर संशयितांची नावे आहेत. याबाबतची तक्रार उपनगर पोलीस ठाण्यात दाखल झाली असून त्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Business Idea | तुम्हाला तुमचा स्वतः चा बिजनेस सुरु करायचा मग हा व्हिडियो जरूर पहा

संबंधित पीडित महिलेवर गेल्या तीन वर्षांपासून या अत्याचार (abused) केल्याचे तक्रारीत नमूद आहे. त्यामुळे पीडितेने शेवटी पोलिसांकडे धाव घेत घटनेची माहिती दिली. दरम्यान पीडितेने दाखल केलेल्या तक्रारीनुसार संशयितांनी संगनमत करून फिर्यादीस संशयित देवबाबाने त्याच्या राहत्या घरी व इतर ठिकाणी फिर्यादीच्या संमतीविना अत्याचार केलेय त्याबाबत कोठेही वाच्यता केल्यास जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अंगात दैवी शक्ती असल्याचे भासवले, फिर्यादीस घर देण्याचे आमीष देऊन पाच लाख रूपये देखील उकळले. पैसे परत मागितल्यावर धमकावले. ब्लॅकमेल करून फिर्यादीची फसवणूक करून शारीरिक व मानसिक अन्याय अत्याचार केले म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिक शहरातील उपनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहणाऱ्या भोंदूबाबाने एप्रिल 2018 पासून ऑक्टोबर 2022 पर्यंत पीडितेवर अत्याचार केल्याचे नंदू तक्रारीवरून निदर्शनास आले आहे.

Web Title: a woman was abused for three years by pretending to have divine power in her body

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here