धक्कादायक: घरात घुसून महिलेवर सामुहिक बलात्कार, तिघांवर गुन्हा
Gang rape: कुर्ला येथील धक्कादायक घटना, तिघांनी घरात घुसून महिलेवर आळीपाळीने बलात्कार, व्हिडियो केला तयार अन व्हायरल करण्याची धमकी. शरीरावर जखमा.
मुंबई: कुर्ला येथे धक्कादायक घटना घडली आहे. येथे तीन जणांनी एका महिलेच्या घरात घुसून तिच्यावर सामूहिक बलात्कार (Gang Rape) केल्याची घटना समोर आली आहे. तसा आरोप पीडित ४२ वर्षीय महिलेने केला असून याबाबत महिलेने पोलिसात तक्रार केली आहे. पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, महिलेने दाखल केलेल्या तक्रारीनुसार ही घटना बुधवारी या महिलेच्या घरी कोणीही नसताना घडली. घरी कोणीही नसल्याचे हेरत आरोपी या महिलेच्या घरात घुसले. त्यांनी या महिलेवर आळीपाळीने अत्याचार केला. आरोपींनी या कृत्याचा व्हिडीओ रेकॉर्ड केला असून पोलिसांकडे गेली तर हे व्हिडीओ व्हायरल करण्याचीही धमकी या महिलेला देण्यात आली.
Earn Money Online | स्मार्टफोनचा वापर करून ऑनलाईन कमाई | लाईफटाईम इनकम
दरम्यान, या महिलेने अत्याचारादरम्यान मारहाण केल्याचाही दावा केला आहे. धारदार शस्त्रांनी मला मारण्यात आले असून माझ्या शरीरावर जखमा आहेत, असे या महिलेने आपल्या तक्रारीत म्हटले आहे. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.
Web Title: woman was gang rape by entering the house
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App